सांगली -मिरज महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना लाचप्रकरणात अटक झाल्यानंतर या कारवाईचे पडसाद वेंगुर्ले शहरातही उमटले आहेत. वेंगुर्ले शहरात काही नागरिक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून या कारवाईचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. वैभव साबळे यांनी वेंगुर्ले शहरात मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना काळात शहरातील नागरिक, व्यापारी यांना प्रचंड त्रास दिला होता. त्यांच्यावर झालेली कारवाई हा नियतीने दिलेला धडा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.