अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
अॅक्सिकॉसने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने दावा केला आहे की, सौदी अरेबियाला इस्रायलपेक्षा कमी प्रगत एप-३५ लढाऊ विमान दिली जाणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अशी माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी दिली असल्याचे हवाल्याने म्हटले आहे. आता खरंच अमेरिका सौदीला कमी प्रगत विमाने देणार आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी क्राउन प्रिन्सला धोका दिला आहे, अशा चर्चा सर्वत्र सुरु आहे.
तर मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेकडून सौदी अरेबियाला पुरवल्या जाणाऱ्या एफ-३५ विमानांचा ताकद इस्रायलला दिल्या जात असलेल्या विमानांसारखी नसणार आहे. एफ-३५ हे अत्याधुनिक प्रणाली, इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणे आणि रडार-जॅमिंग तंत्रज्ञानाने प्रगतशील आहे. परंतु ही सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान सौदीला दिल्या जाणाऱ्या विमानांमध्ये नसणार आहेत.
ट्रम्प आणि सौदीच्या क्राउन प्रिन्समध्ये झालेल्या मुलाखतीत ही विमाने देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते. ट्रम्प यांनी स्वत:च सौदीला कमी प्रगतशील विमाने दिली जातील असे क्राउन प्रिन्स सोबतच्या बैठकीत म्हटले होते. तर या बदल्यात सौदी अरेबिया अमेरिकेकडून अंदाजे ३०० लढाऊ टॅंक खरेदी करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्को रुबियो यांनी इस्रायलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा सांगण्यात आले की अमेरिका आणि सौदी अरेबियाचा F-35 करार हा इस्रायलच्या QME धोरणावर परिणा न करणारा आहे. QME धोरणानुसार, अमेरिकन इस्रायलची लष्करी सुरक्षा आणि बळकटी सुनिश्चित करते. याच कारणास्तव अमेरिका सौदीला कमी प्रगतशील एफ-३५ लढाऊ विमाने देणार आहेत.
ब्लूमर्गच्या अहवालानुसार, क्राउन प्रिनस मोहम्मद बिन सलमान आणि ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान एफ-३५ विमानावर चर्चा झाली होती. परंतु हे अमेरिकेचे सर्वात प्रगतशील विमान सौदीला मिळाले तर मध्य पूर्वेत इस्रायलची लष्करी सुरक्षा धोक्यात येऊ शकते. शिवाय गेल्या अनेक काळापासून अमेरिका इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित करतो. अशा वेळी ट्रम्प यांनी सौदीला प्रगतशील विमाने दिली तर इस्रायलशी संबंध बिघडू शकतात. पण सौदी आणि इस्रायलमधील संबंध सुधारल्यास ट्रम्प नक्कीच एफ-३५ सौदीला विकतील
सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण






