सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रीशिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा ऐतिहासिक वारसा जपणारा पुण्यातील भिडे वाडा चित्ररथ सोलापुरात दाखल झाला. या प्रेरणादायी उपक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सुपर मार्केट येथील जुनी मिल मैदाना समोरील महात्मा फुले यांच्या अर्धपुतळा परिसरात या चित्ररथाचे झाले असून नागरिकांना ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले. या चित्ररथातून फुले दांपत्यांनी सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा गौरवशाली इतिहास उलगडण्यात आला. हा उपक्रम मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चित्ररथाचे स्वागत केले