प्रसिद्ध समाजसेविका सीमा सिंह (फोटो- सोशल मिडिया)
लोकसभेत नामंजूर झाल्याने महिला विधेयक आरक्षण
बहुमत प्राप्त न झाल्यामुळे विधेयक नामंजूर
समाजसेविका सीमा सिंह यांचा विरोधकांवर निशाणा
मुंबई: काल लोकसभेत केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केले होते. मात्र एनडीए सरकारच्या काळात प्रथमच एखादे विधेयक नामंजूर होण्याची घटना घडली. महिला आरक्षण विधेयक दोन तृतीयांश बहुमत प्राप्त न झाल्यामुळे नामंजूर झाले. आता यावरून मेघाश्रे फाऊंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि प्रसिद्ध समाजसेविका सीमा सिंह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे.
सीमा सिंह म्हणाल्या, “विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला खोडा घातला आहे आणि त्यांनी महिलांच्या हक्कांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. कॉँग्रेस आणि इंडी आघाडीने विधेयकाला विरोध करून देशातील कोट्यवधी महिलांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. केवळ मतदारसंघ पुनर्रचना हा मुद्दा धरून विरोधकांनी हे ऐतिहासिक विधेयक रोखून ठेवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान’ करण्याचे आवाहन केले होते. मात्र विरोधकांनी हे आवाहन धुडकावून लावले आहे. त्यामुळे त्यांनी एक मोठी ऐतिहासिक संधी गमावली आहे, असे सीमा सिंह म्हणाल्या. ‘देशातील जनता त्यांना माफ करणार नाही. नारी सक्षमीकरणाच्या प्रवासात विरोधकांनी अडथळा नक्कीच निर्माण केला आहे, पण देशातील महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांनी उचललेली पावले आता कोणीही रोखू शकणार नाही,’ असे सीमा सिंह म्हणाल्या.






