फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात सोन्याचा भाव ७३ हजार पार्टी १० ग्रामवर येऊन ठेपला आहे. सोन्याच्या वाढत्या दराला अनेक जण कंटाळली आहेत. मध्यम वर्गीयांनी तर सोन्याचा विषयच सोडून दिला आहे. ज्या मध्यम वर्गीयांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे त्यांना या वाढत्या भावामुळे गुंतवणूक करणे कठीण जात आहे. काही ठिकाणी तर फक्त लग्नसोहळ्यापुरतेच सोन्याचे डोहाळे पुरवले जात आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीला पाहून अनेक जणांनी गळ्यात सोने घालणे कमी केले आहे कारण बाहेर लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. सोन्याच्या या वाढत्या किमतीदरम्यान लोकांना खरे तर नाही म्हणा पण वैचारिक सुख देण्याकरिता एका नेटकऱ्याने त्याच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर असा काही फोटो शेअर केला आहे, ज्याला पाहता तुम्हीदेखील नक्कीच विचार कराल कि तो काळ वापस आला असता तर…
जिंदगी गुलजार है असे या इंस्टाग्राम हॅण्डलचे नाव आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पुण्यातील रविवार पेठे येथे असलेल्या वामन निंबाजी अष्टेकर यांच्या ज्वेलर्सचा बिल आहे. विशेष म्हणजे हे बिल १९५९ सालचे आहे. या फोटोत सोन्याचा भाव चक्क ११३ रुपये दिसत आहे. म्हणजे त्याकाळी ११.६६ ग्राम सोन्याची किमंत ११३ रुपये इतकी होती. आताच्या काळात व्यक्ती ११३ रुपयात एकवेळचे जेवण जेवतो. काही ठिकाणी तर एकवळेचे जेवणही यापेक्षा महाग असते. जर तुम्हाला वाटत असेल कि कदाचित तो काळ परत आला असता तर आपण खूप सोने खरेदी करू शकलो असतो, तर तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा मारण्याचा विचार करत आहात. त्याकाळी सोने इतके स्वस्त होते कारण त्याकाळच्या लोकांची परिस्थितीही तितकी बेताची होती.
या पोस्टखाली अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एक युजर म्हणतो कि, ‘तेव्हाचे ११३ रुपये म्हणजे आताचे १,१३,००० रुपये होय.’ तर दुसऱ्याचे म्हणणे आहे कि,” त्यावेळी लोकांची मजुरी १० ते २० पैसे असायची जर त्यांनी ११३ रुपये साठवायचे तरी म्हटले तर त्यांना आरामात ३ ते ४ वर्षांचा कालावधी लागेल.”