(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधीजीवघेणे स्टंट्स दाखवले जातात तर कधी भयानक अपघात तर कधी हास्यास्पद आणि विचित्र घटना देखील इथे शेअर केल्या जातात ज्यातील दृश्ये आपल्याला थक्क करून जाते. सध्या देखील सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यातील दृश्ये तुम्हाला आश्चर्यचकित करण्यास पुरेशी आहेत. यात अपघाताचा एक अजब थरार दिसून आला जो कोणत्या चमत्काराहून कमी नाही. नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल मात्र आता याचे खरेखुरे वास्तविक उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहता येणार आहे. व्हिडिओत एका थरारक अपघाताचे दृश्य दिसून आले जे कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवतील. तर यात एक चिमुकला आपल्या वडिलांची नजर चुकवून चालू रस्त्यावर जाताना दिसतो. त्याचे वडील त्याला परत आणतील तितक्यात तिथे भरधाव वेगात एक ट्रक येतो. पुढे काय घडते ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत मात्र याचा शेवट तुम्हाला थक्क करेल इतके नक्की.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात चालू रस्त्यावरचे काही दृश्ये दिसून येत आहेत. यात एक व्यक्ती आपल्या रस्त्याच्या कडेला आपल्या दुचाकीवर बसलेला आहे, त्याच्या मागे एक लहान मुलगी बसलेली दिसते. त्याच वेळी एक चिमुकला अचानक पळत पळत चालू रस्त्यावर जातो. त्याला असे जाताना पाहताच व्यक्ती आपला हाथ पुढे करत त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो मात्र चिमुकला त्यांना दुर्लक्ष करत मजेमजेत रस्त्यावर जाऊ लागतो. याचवेळी समोरून एक ट्रक भरधाव वेगात येतो.
मात्र मुलाला ट्रकची धडक बसेल याच्याआधीच तो बाजूला होतो आणि काही सेकंदाच्या फरकाने या चिमुकल्याचा जीव वाचतो. व्हिडिओत तुम्हाला ट्रक आल्याचे पाहताच व्यक्ती डोक्याला हाथ लावतानाही दिसून येतो. त्याला बहुदा मुलाची शाश्वती वाटत नसावी मात्र सुदैवाने यात मुलाचा जीव वाचतो आणि व्हिडिओचा इथेच शेवट होतो. तेथील सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये फार थरारक असून लोक आता हा व्हिडिओ पाहून आवाक् झाले आहेत.
दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @alameen_thaha_vlogs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “लहान मुले नेहमी आत्मघातकी मोहिमेवर असतात असे का वाटते?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझा आत्मा माझे शरीर सोडून परत आला”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वडिलांची भीती जाणवली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.