कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व आता बऱ्याच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. हा एक रिऍलिटी शो गेम शो आहे. हा शो खरंतर 100 दिवसांचा असतो मात्र जसजसा शो पुढे जात आहे शो’मध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट दाखल होत आहे. हे ट्विस्ट फक्त प्रेक्षकांनाच नाही तर स्पर्धकांनाही थक्क करत आहेत. मागेच बिग बॉसने केलेल्या घोषणेनुसार, यावर्षीचे हे नवीन पर्व 100 नाही तर फक्त 70 दिवस असणार आहे म्हणजेच हा शो अवघ्या 70 दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मात्र सध्या बिग बॉस एका वेगळ्या कारणास्तव सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस संबधित एक स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आला आहे. हा स्क्रीनशॉर्ट पाहून आता अनेकांना धक्का बसला आहे. हा स्क्रीनशॉर्ट आता मोठ्या वेगाने व्हायरल होत असून तुम्हीही बिग बॉस फॅन असाल तर यातील नमूद केलेल्या गोष्टी पाहून तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल.
हेदेखील वाचा – फुग्यांसह हवेत उडू लागली अन् क्षणार्धात घडले असे की… पाकिस्तानी तरुणीचा आगळावेगळे फोटोशूट व्हायरल
सोशल मीडियाच्या काही ग्रुप्सवर विकिपीडियाचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला जात आहे. यामध्ये बिग बॉस मराठीच्या 70 दिवसांचा संपूर्ण आढावा देण्यात आला आहे. म्हणजे कॉम कधी घराबाहेर पडणार, कसा घराबाहेर पडणार अशी सर्व्ह माहिती येत देण्यात आली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, यात फायनल फेरीत जाणारे स्पर्धक आणि कोण विजेता होणार हेदेखील सांगण्यात आले आहे.
या लिस्टमध्ये दाखवल्याप्रमाणे, अभिजित बिग बॉसच्या या पर्वाचा विनर ठरणार आहे तर अंकिता उपविजेता ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सुरज पैसे घेऊन शो सोडणार आणि जान्हवी तिसऱ्या तर निकी चौथ्या स्थानावर असणार आणि धनंजय, पंधरीनाथ, वर्षा हे सर्व सदस्य एलिमिनेट होणार असे या व्हायरल स्क्रीनशॉर्टमध्ये दाखवण्यात येत आहे.
हेदेखील वाचा – अजगराने महिलेभोवती घातला विळखा, गिळणार तितक्यात… धडकी भरवणारा Video Viral
मात्र खरंतर या व्हायरल स्क्रीनशॉर्टची जेव्हा पडताळणी करण्यात आली तेव्हा काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हा स्क्रीनशॉर्ट विकीपीडिया वरून काढल्याचा दावा करण्यात आला आहे मात्र हे फेक आहे. हा स्क्रीनशॉर्ट पाहून आता अनेकजण बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचा आरोप करत आहेत मात्र हा स्क्रीनशॉर्ट कितपत खरा आहे याची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. 14 दिवसांनी बिग बॉसचा ग्रँड फिनाले असणार आहे, मात्र याच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.