अजगर, साप या विषारी प्राण्यांना पाहताच भल्याभल्यांची हवा टाइट होते. त्यांचे विष क्षणार्धात व्यक्तीला मृत्यूच्या दारी पोहचवू शकते. हे सरपटणारे प्राणी कधी माणसाला धरतील याचा नेम नाही. आपल्या चातुर्याने ते समोरच्याच्या नकळत त्याच्यावर हल्ला करतात आणि काही क्षणातच त्याला आपला शिकार बनवतात. आता भल्यामोठ्या अजगराचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील मात्र हा अजगर आपल्या घरात घुसला तर काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
सध्या यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका महिलेच्या घरात भलामोठा अजगर घुसल्याचे दिसून येत आहे. अक्षरशः यात अजगराने महिलेच्या शरीराभोवती संपूर्णपणे विळखा घातल्याचे दिसून येत आहे. यावेळी या अजगराने महिलेला जिवंत गिळण्याचा देखील प्रयत्न केला. व्हिडिओतील महिलेची अवस्था पाहून तुमच्या धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
हेदेखील वाचा – “मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याचे उत्तर ऐकून पोट धरून हसाल, Video Viral
माहितीनुसार, अजगराने महिलेच्या घरात घुसून तिला आपला शिकार बनवले आणि तिच्या संपूर्ण शरीरावर विळखा घालण्यास सुरुवात केली. अजगराच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेची जवळपास दोन तास धडपड सुरू होती, पण तिला काही यश आले नाही. उलट अजगर त्या महिलेच्या शरीराभोवती आवळलेला फास आणखी घट्ट करीत होता, यामुळे हळूहळू तिला श्वास घेण्यासही त्रास जाणवू लागला. यानंतर महिला मोठमोठ्याने मदतीसाठी ओरडू लागली. यावेळी शेजारी लोकांनी ही हाक ऐकली आणि त्यांनी वनविभागाच्या लोकांना बोलावून घेतले आणि मग महिलेचा जीव वाचला.
या हल्ल्यात महिलेचा जीव तर वाचला मात्र तिच्या पायाला अजगराने चावा घेतला आणि तिला दुखापत केली. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला थायलंडची असून तिचे नाव अरोम अरुणरोज आहे. या महिलेचे वय 64 आहे. महिलेने सांगितले की, ती स्वयंपाकघरात पाणी पित होती, यावेळी पाठीमागून एका महाकाय अजगरानं तिच्यावर हल्ला केला, अजगराने तिला चावा घेतला. त्यानंतर त्याने तिच्या कमरेभोवती आपला फास गुंडाळला, अजगराने हळहळू महिलेच्या संपूर्ण शरीराभोवती विळखा घातला. यानंतर तिने त्याच्या तावडीतून आपली सुटका करण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र अजगराची पकड भक्कम होईतो ज्यामुळे तिला त्यातून सुटणे शक्य झाले नाही. नंतर हळूहळू अजगराने आपली पकड इतकी घट्ट केली की, महिलेला हालचाल करणे कठीण झाले. ती कशीबशी दरवाजाजवळ येऊन पडून राहिली.
Thai woman spent almost two hours fighting, four-metre python that attacked her while she was washing dishes, biting her several times and trying to strangle her.
A neighbor came running to the noise and called the rescuers. The woman survived and didn’t receive serious injuries pic.twitter.com/TYRslEYSNx
— Charlie (@Acuteremod) September 18, 2024
हेदेखील वाचा – हजार रुपयांच्या बॅटची लालबागच्या दरबारात लागली बोली, फायनल किंमत ऐकून कपाळाला हाथ लावाल, Video Viral
वन विभागाच्या रेस्क्यू टीमने महिलेचे प्राण वाचवले आणि अजगराच्या तावडीतून तीची सुटका केली. टीमने जेव्हा प्रथम पाहिले तेव्हा त्यांना अजगराने महिलेचा गळा दाबल्याचे दिसून आले. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. स्थितीत टीमने आधी अजगराचे तोंड पकडले आणि नंतर हळूहळू महिलेची सुटका केली. यासाठी त्यांना दोन तास लागले. बचाव केल्यांनतर महिला पिवळी झाली होती आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.