आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. तुम्ही अनेक लोक पाहिले असतील जे हास्यास्पद गोष्टी करतात. काजीना तर व्हायरल होण्यासाठी आपला जीवदेखील धोक्यात घालायला तयार असतात. उंचावरून उडी मारणे, धोकादायक स्टंट करणे अशा अनेक गोष्टी लोक करू पाहतात. मात्र व्हायरल होण्यासाठी केलेल्या या गोष्टी नेहमीच फायद्याच्या ठरतात असे नाही अनेकदा यामुळे लोकांचे जीव धोक्यात जातात.
सध्या एका पाकिस्तानी तरुणीचा आगळावेगळे फोटोशूट फार व्हायरल होत आहे. या तरुणीने आपला 20 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी असे काम केले की ते पाहून सर्वजण आता आवाक् झाले आहेत. व्हायरल फोटोंमध्ये ही मुलगी फुग्याच्या मदतीने हवेत लटकताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने त्या फोटोशूटची सत्यता उघड केली.
हेदेखील वाचा – अजगराने महिलेभोवती घातला विळखा, गिळणार तितक्यात… धडकी भरवणारा Video Viral
राबीका खान ही एक पाकिस्तानी इंफ्लुएंसर आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर 59 लाख लोक फॉलोवर्स आहेत. नुकतीच ती 20 वर्षांची झाली. यावेळी, तिने एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि तिच्या हातात बरेच फुगे आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे फुग्याच्या मदतीने ती हवेत उडताना दिसते. तिला हवेत उडताना पाहून अनेकांना आता धक्का बसला आहे पण वास्तव काही वेगळेच आहे, जे रेबेकाने एक वेगळा व्हिडिओ पोस्ट करून सांगितले आहे.
हेदेखील वाचा – “मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याचे उत्तर ऐकून पोट धरून हसाल, Video Viral
तर अनेकांना वाटत असलेले सत्य हे सत्य नव्हते. रेबेका फुग्यांमुळे नाही तर क्रेनच्या मदतीने हवेत उडत होती. ज्याचा खुलासा तिने दुसरा व्हिडिओ पोस्ट करून केला. या व्हिडिओमध्ये रेबेका क्रेनच्या मदतीने हवेत उडताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले – क्रेनच्या मदतीने हवेत लटकणे खूप कठीण होते, मी सांगूही शकत नाही. मी हे फक्त माझ्या मनापासून करायचे आहे म्हणून केले. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी सर्व मार्ग सोपे होतील.दरम्यान तिच्या या व्हायरल व्हिडिओला 93 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर 1 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक करून यावर आपली पसंती दर्शवली आहे.