 
        
        अमेरिकेतील पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ झाला व्हायरल (फोटो- ट्विटर)
अमेरिकेतील कोर्टाच्या सुनावणीचा व्हिडिओ व्हायरल 
सुनावणीला पोलिस अधिकारी बिना पॅन्टचा उपस्थित 
सोशल मिडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
Viral Video: सोशल मिडियावर रोज आपण अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील एका कोर्टातील असल्याचे समोर आले आहे. सोशल मिडियावर रोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच अमेरिकेतील एका पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नक्की काय आहे, ते पाहुयात.
सोशल मिडियावर एका पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ अमेरिकेतील असल्याचे समोर आले आहे. कोर्टाच्या सुनावणीत हा पोलिस अधिकारी बिना पॅंटचाच हजर असल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील मिशिगन राज्यातील असल्याचे म्हटले जात आहे.
NEW: Detroit Police officer Matthew Jackson shows up to a Zoom hearing without pants on. Judge Sean B. Perkins: "Officer Jackson. Good morning to you. Can you put your appearance on the record, please?" Officer Jackson: *Raises hand* Judge Perkins: "You got some pants on,… pic.twitter.com/hC2BY2Tmqt — Collin Rugg (@CollinRugg) October 29, 2025
कोर्टात सुनावणी सुरू होती. तेव्हा पोलिस अधिकारी ऑनलाइन स्वरूपात सुनावणीला हजर राहिले. हे प्रकरण एका महिलेने दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दलचे होते. न्यायाधीश आणि वकील व पोलिस अधिकारी ऑनलाइन स्वरूपात हजर होते. पोलिस अधिकारी बोलत असताना त्याने त्यांचा कॅमेरा अशा प्रकारे सेट केला की त्यामध्ये ते पूर्णपणे दिसून येतील. यामध्ये त्या अधिकाऱ्याने युनिफॉर्म घातला होता. मात्र त्याने पॅंट घातली नव्हती. हे एका महिला वकिलाच्या लक्षात आले. त्यानंतर तिने हा मुद्दा उपस्थित केला.
दारूच्या नशेत मद्यपीने वाघाला समजले मांजर
वाघ हा जंगलातील एक धोकादायक शिकारी मानला जातो. त्याचा हल्ला इतका जबरदस्त असतो की प्राणीच काय तर माणसंही त्याच्या सामोर टिकू शकत नाही. वाघाला पाहताच अनेकजण त्याच्यापासून दूर पळू लागतात, आपला जीव वाचवू लागतात. अशातच आता सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक मद्यपी वाघाला दारू पाजताना दिसून आला. वाघ ज्याला पाहून दुरूनच लोक पळून जातात, त्याला पाहून मद्यपी घाबरला नाही तर त्याने चक्क त्याच्यासमोर दारूची बॉटल पुढे केली. ही घटना आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
Power of DESI DAARU .. In Pench, India, Raju Patel, slightly drunk after a late-night card game, mistook a Bengal tiger for a friendly cat. He casually patted it, offered his liquor, and lived to tell the tale. Forest officials later rescued the tiger. Raju’s now a local legend… pic.twitter.com/rmgzkmJgnz — Sarcastic Sage (@Sarcasm1105) October 29, 2025
काय घडलं व्हिडिओत?
हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सिवनी येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. एक माणूस दारूच्या नशेत होता, हातात बाटली घेऊन रस्त्यावरून हळू हळू चालत होता. अचानक त्याच्यासमोर एक वाघ आला. वाघ दिसला की माणूस आपला संयम गमावून पळून जाईल असे वाटत होते पण घडलं काही भलतंच. माणूस वाघाला मांजर समजतो आणि शांतपणे वाघाला गोंजारु लागतो, त्याचे डोके थोपटतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो माणूस वाघाला दारू देतानाही दिसतो. व्हिडिओमध्ये वाघ शांतपणे व्यक्तीजवळ उभा असल्याचे दिसते. पुढे व्यक्ती वाघाला जेव्हा दारू ऑफर करतो तेव्हा वाघ आपली मान फिरवतो. दारू पिल्यानंतर व्यक्तीचे वाढलेले धाडस आणि वाघाची शांतता आता अनेकांना थक्क करत आहे. घटनेचा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आला आहे.






