(फोटो सौजन्य: instagram)
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना मानली जाते. प्रेम हे सहजासहजी होत नाही आणि ते एकदा का झालं की ती व्यक्ती आपल्या पार्टनरसाठी वाटेल ते करायला तयार असते. यात आपुलकी, माया, काळजी असा भावनांचे एकत्रिकरण असते. एकमेकांसोबत भांडण, मदत करणं, काळजी घेणं अशा अनेक गोष्टी प्रेमात घडत असतात. जसजसा वेळ जातो तसतसे प्रेमाचे हे नाते आणखीन घट्ट होत जाते आणि या फोन व्यक्ती आणखीन जवळ येऊ लागतात. आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी त्या व्यक्तिसोबत शेअर करू लागतो अशात जेव्हा ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा त्याचे दुःख हे फार खोलवर आपल्याला धक्का देऊन जाते. असेच काहीसे एका तरुणासोबत घडल्याचे दिसून येत आहे.
सध्या एक भावूक व्हिडिओ सोशल मेडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक तरुण आपल्या प्रेयसीच्या आठवणीत ओक्साबोक्शी रडताना दिसून आला. तरुणाने नवीन कार खरेदी केली असते. जिच्या सेलिब्रेशनवेळी तो आपल्या प्रेयसीला आठवत तिच्यासाठी काही खास करू पाहतो मात्र शेवटी त्याचा बांध सुटतो आणि तो तिथेच रडू लागतो. तरुणाचे हे रडणे पाहून आता अनेकजण भावुक झाले आहेत. यातील दृश्ये तुमच्याही डोळ्यात पाणी आणतील. नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका तरुणाने नवीकोरी कार खरेदी केली आहे. यावेळी आपल्या प्रेयसीच्या आठवणीत तो तिचा फोटो कारच्या फ्रंट सीटवर ठेवतो. तुम्ही जर नीट पाहाल तर यावेळीच त्याचा डोळ्यातून अश्रू येण्याच्या वाटेवर असतात मात्र तो कसाबसा आपल्याला रोखतो आणि प्रेयसीच्या फोटोसमोर एक फुलांचा गुच्छ ठेवतो. यांनतर तो त्या सीटखाली बसतो आणि ढसाढसा रडू लागतो. यांनतर तरुणाचे मित्र त्याला सांत्वन देतात मात्र तरीसुद्धा तरुणाचे अश्रू काही केल्या थांबत नाही. हा व्हिडिओ आता अनेकांना भावुक करत असून लोक यातील दृश्ये पाहून तरुणाच्या प्रेमाला सलामी देत आहे. आजच्या जगात असे दृश्ये फार कमी पाहायला मिळते. एका व्यक्ती गेला की दुसरा व्यक्ती त्याच्या जागेवर येण्यासाठी तयारच असतो अशात देवाघरी गेलेल्या आपल्या प्रेयसीसाठी रडणाऱ्या बॉयफ्रेडला पाहून अनेकांना त्याचे फार अप्रूप वाटले.
गजराजाशी मस्ती मगरीला पडली महागात, सोंडेला पकडताच असे केले… हत्तीचे हिंसक रूप पाहून थक्क व्हाल; Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @marathi_memer_2.0 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘आणि लोक म्हणतात पुरुषांचं प्रेम खरं नसतं’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून यावर अनेकांनाही कमेंट्स करत तरुणाच्या या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मानल भावा, तशी व्यक्ती असन गरजेचे आहे Salute आहे भावा तुला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज शरीराने जरी नसली तरी मनात कायम जवळ राहील तूझ्या”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.