(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर तुम्हाला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी इथे शेअर केल्या जातात ज्यांना पाहून कुणीही आवाक् होईल. तसेच इथे काही प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर होतात. प्राण्यांचे जीवन हे मानवापेक्षा फार वेगळे असते ज्यामुळे त्यांचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर शेअर होतात तेव्हा ते युजर्सचे मनोरंजन करण्याचे काम करतात. इथे प्राण्यांमधील शिकारीचे दृश्य देखील बहुतेकदा शेअर होते जे पाहून आपल्याला थक्क व्हायला होईल.
सध्या देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक एक काळा डुक्कर आणि सिंह विहिरीत अडकल्याचे दिसून आले. आता सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो नेहमीच आपल्या शिकारीच्या शोधात असतो अशात शिकारीचं जेव्हा शिकाऱ्यासह एकाच ठिकाणी अडकतो तेव्हा काय घडते हे पाहणे फार मनोरंजक ठरते. आता यात सिंहाने डुक्कराची शिकार केली की नाही आणि दोघेही प्राणी समोरासमोर आल्यावर नक्की काय घडलं ते या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.
वाघ त्याच्या वेगासाठी ओळखला जातो, तो त्याच्या चपळतेसाठी ओळखला जातो. डोळे मिचकावत वाघ आपली शिकार पूर्ण करतो. पण अनेक वेळा वाघाची चपळता त्याच्यासाठी उडणारा बाण ठरते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडले आहे. या व्हिडिओमध्ये एक विहीर दिसत आहे. ज्यामध्ये वाघ आणि रानडुक्कर दिसत आहेत. प्रत्यक्षात वाघ या रानडुकराची शिकार करण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगितले जात आहे. मात्र त्यानंतर जंगली डुकराने विहिरीत उडी घेतली. त्यानंतर वाघही या विहिरीत पडला. काही वेळाने लोकांना ही बाब समजल्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाला माहिती देण्यात आली. तिथल्या बचाव पथकाने वाघ आणि रानडुकर दोघांची सुखरूप सुटका केली. ही घटना मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A tiger and a boar ccidentally fell into a well in Pipariya village near the reaserve. Thanks to the swift action of the Pench Tiger Reserve rescue team, big cat and boar were safely rescued! With expert coordination & care, both animals were pulled out unharmed and released back pic.twitter.com/s8lRZH8mN5
— Pench Tiger Reserve (@PenchMP) February 4, 2025
वाघ-रानडुक्करचा हा व्हिडिओ @PenchMP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आली असून या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिकचे व्युव्ज मिळाले आहेत . अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पेंच वनविभागाच्या त्वरित कारवाईने बहुमोल जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान केले!! दुसरा प्राणी रानडुक्कर आहे का? तो पाण्यात मजा घेत असल्याचे दिसत आहे “.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.