सौंदर्य कोणाला नको हवे असते. मात्र आजच्या काळात सुंदरतेची व्याख्या फार बदलली आहे. सुंदरता म्हणजे काय? हेच लोक विसरू लागले आहेत. आपली नाके-डोळी सुंदर असली, आपल्याकडे आकर्षक फिगर असली की आपण किती सुंदर आहोत असे लोकांना वाटू लागते. मात्र कधी कधी अतिसुंदर दिसणेदेखील एक शाप बनू शकते हे पटवून देणारा एका मॉडेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. मेकओवरसाठी तिने प्रसिद्धी आणि भरपूर पैसे कमावले, परंतु एका कारणामुळे तिला आता मोठा पश्चाताप होत आहे. तिचे सौंदर्य आता तिच्यासाठी एक शाप बनून राहिल्याचे तिने सांगितले आहे.
ब्राझीलची मॉडेल जेनिना प्रझेरेसची कथा सध्याच्या आधुनिक आणि ग्लॅमरस जगाशी संबधित आहे. ग्लॅमरच्या दुनियेत काम करणाऱ्या लोकांवर अनेकदा आकर्षक दिसण्याचा प्रचंड दबाव असतो आणि या दबावाचा त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो.आपले सौंदर्य हे आपल्यासाठी तुरुंग बनल्याचे मॉडेलचे म्हणणे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या मॉडेलने कॉस्मेटिक सर्जरी करून आपल्याला एक हूर परी बनवून घेतले. यासाठी तिने 7,58,000 पौंड (म्हणजे 8.35 कोटींहून अधिक) रुपये खर्च केले. मात्र आता या सर्वाचा तिला पश्चाताप होत आहे. ती म्हणाली, तिने खूप प्रसिद्धी आणि पैसा कमावला आहे, पण आता ती लोकांच्या अपेक्षांना कंटाळलीय.
हेदेखील वाचा – सीएमला पाहायला नाही तर मासे लुटायला आली होती लोकं, नितीश कुमारांच्या कार्यक्रमात माशांची लूट, Video Viral
या मॉडेलचे वय 35 वर्ष असून आपल्या जीवनाची व्यथा मांडताना ती म्हणाली, लोक नेहमीच तिच्याकडून काही ना काही अपेक्षा करत असतात. जनानाने सांगितले की, ‘ ती अत्यंत सुंदर असल्यामुळे कधी कधी लोक माझ्याकडे एखादी वस्तू किंवा ट्रॉफी म्हणून बघू लागतात. माझे सौंदर्य एक ‘जेल’ बनले आहे, ती पुढे म्हणाली, ‘अशा स्थितीत आता माझी मैत्रिणींबरोब मैत्री टिकवणे देखील कठीण आहे, कारण मला अनेकदा स्पर्धात्मक आणि हेवा वाटतो. त्यामुळे नातेसंबंध निर्माण करणे कठीण होते. आतापर्यंत तिने तीन नोज जॉब्स, ब्राझिलियन बट लिफ्ट, रिब काढणे, तीन बूब जॉब्स आणि बरेच काही केले आहे. ती बोटॉक्स, लिप फिलर्स, बट फिलर्स, चिन फिलर्स आणि अंडर आय फिलर्स दर तीन महिन्यांनी गेल्या 10 वर्षांपासून घेत आहे.
हेदेखील वाचा – तवा सापडला नाही म्हणून चाटवाल्या भैयांनी वापरला अनोखा जुगाड, पाहून तुमचेही डोकं चक्रावेल, पाहा Viral Video
जनानाने महिलांना एक उत्तम सल्ला देत म्हटले की, तिला अशा आहे की भविष्यात महिलांना त्यांचे गुण आणि सामर्थ्याची ओळख होईल. तसेच ग्लॅमरस आणि सौंदर्याच्या मागे पळणाऱ्या प्रत्येकाला तिने सावध करत तिच्या भावना आणि तिची सध्याची परिस्थिती ही इतरांसाठी एक चेतावणी असू शकते, असे म्हटले आहे.