फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बदलत्या तंत्रत्रानाच्या युगात कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा लोक असे असे शोध लावतात की आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे शोध लागतात की त्या व्यक्तीचे कौतुक केल्याशिवाय आपण राहत नाही. जपान हा देश आपल्यापेक्षा तांत्रिक दृष्ट्या प्रगत देश आहे. जपानमध्ये अशा गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या देखील नसतील. सध्या असाच एक आश्चर्यकारक शोध जपानी इंजिनियर्सनी लावला आहे.
तुम्हाला जर अंघोळीचा कंटाळा येत असेल तर ही आनंदाची बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार जपानी इंजिनियर्सनी एका अशा मशिनचा शोध लावला आहे जी माणसांना स्वच्छ करते. आश्चर्य वाटले ना, होय पण हे खरे आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या मशीनचे नाव “मिराई निंगेन सेंटाकुकी” (MIRAI NINGEN SENTAKUKI) असे आहे. ही मशिन फक्त 15 मिनिटांत माणसाला पूर्णपणे स्वच्छ करू शकते. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने ही मशीन तयार करण्यात आली असून शारीरिक स्वच्छतेची प्रक्रिया अगदी सोपी आणि जलद करते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मशीनचे वैशिट्ये
जपानच्या ओकासा येथील प्रसिद्ध ‘शॉवरहेड कंपनी’ ने ही मशीन विकसित केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही मशीन फक्त 15 ते 20 मिनिटांत संपूर्ण शरीराची स्वच्छता करते. या मशीनमध्ये तुमच्या शरीराचे विश्लेषण करणारी देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. ही सुविधा साफसफाईच्या प्रक्रियेला वैयक्तिकरित्या अनुकूल करते. मिळालेल्या माहितीनुसार, ही अत्याधुनिक मशीन 2025 साली ओसाका कान्साई एक्स्पोमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे, जिथे सुमारे 1000 लोकांना ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळेल.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मशीन कसे कार्य करते
हे मशीन वापरण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि आकर्षक आहे. वापरण्यासाठी तुम्हाला एका पारदर्शक पॉडमध्ये बसावे लागते. मशीन सुरू केल्यानंतर गरम पाण्याचा प्रवाह पॉडमध्ये सुरू होतो. त्यानंतर, पाण्याच्या फुग्यांचा वापर करून शरीरावर जमा झालेली घाण आणि मळ काढले जाते. हे पाण्याचे फुगे त्वचेवर अगदी मृदू आणि सखोल स्वच्छता करतात.
AI तंत्रज्ञानामुळे, मशीन तापमान, पाण्याचा दाब आणि स्वच्छतेची पद्धत वापरकर्त्याच्या शरीराच्या प्रकारानुसार समायोजित करते. 15 मिनिटांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, मशीन आपोआप बंद होते, आणि वापरणाऱ्याला ताजेतवाने आणि स्वच्छ अनुभव मिळतो. ही प्रक्रिया केवळ स्वच्छतेची हमी देत नाही, तर वेळेची बचतही करते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा