(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक विचित्र प्रकार शेअर केले जातात. आताही इथे एका जोडप्याचा असाच प्रकार व्हायरल झाला आहे ज्यात जोडप्याने स्पायडर मॅन आणि स्पायडर वूमन बनत स्टंट करू पाहिला मात्र पुढे त्यांच्यासोबत असे काही घडते की त्यांचा संपूर्ण प्लॅनच फिस्कटला जातो. व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये दोघेही हेल्मेट, नंबर प्लेट, आरसा आणि लायसन्सशिवाय दुचाकी चालवताना दिसत आहेत. त्यांचे हे धाडस पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात दोघेही स्पायडरमॅनचे पोशाख परिधान करून रस्त्यावर धम्माल करत असल्याचे दिसते. मात्र त्यांची ही मजा फार काळ टिकत नाही. कारण त्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
हा व्हिडिओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. माहितीनुसार, हे दोघेही नजफगडचे रहिवासी आहेत. पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये त्यांना ताब्यात घेतले. विना हेल्मेट, नंबरप्लेट न लावता, आरशाशिवाय, परवाना नसताना, धोकादायक वाहन चालवणे असे अनेक आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. 20 वर्षांचा आदित्य आणि 19 वर्षांची अंजली अशी दोघांची ओळख आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी हे लोक स्पायडरमॅन म्हणून स्टंटबाजी करत होते, मात्र पोलिसांनी अटक केल्यावर त्यांची सर्व महाशक्ती गायब झाली.
आदित्य आणि अंजली ‘इंडियन स्पाइडी ऑफिशियल’ आणि ‘स्पाइडेग्वेन ऑफिशियल’ या नावांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असत. त्याचा एक व्हिडिओ “स्पायडर मॅन नजफगढ पार्ट 5” व्हायरल झाला होता. यामध्ये दोघेही बाईकवर टायटॅनिक पोज देत मस्ती करताना दिसले. मात्र या प्रकरणात त्याने वाहतुकीचे नियम मोडले. तुम्ही स्पायडरमॅन असो की सुपरमॅन, रस्त्यावर स्टंटबाजीला जागा नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याच्या या कृतीने लोकांना हसवले आणि विचार करायला भाग पाडले. सुरुवातीला लोक त्याच्या धाडसाचे आणि कार्यशैलीचे कौतुक करत होते, पण पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचे सर्व शौर्य मातीत मिळाले.
#WATCH | Delhi: Two persons, including a woman, were arrested under Motor Vehicles Act from Najafgarh after a video went viral on social media in which a person was riding a bike without a helmet, a number plate, a mirror or a license, and was doing stunts in the costume of… pic.twitter.com/uMjw2MgWki
— ANI (@ANI) April 26, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @ANI या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या गुन्हेगारांवर कडक कारवाई होईल अशी आशा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते फक्त काही निरागस मजा करत होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.