(फोटो सौजन्य: Instagram )
सोशल मीडियावर दररोज गुन्ह्यांशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ इतके धोकादायक असतात की त्यातील दृश्ये पाहताच लोकांचे हातपाय थरथर कापू लागतो. सध्या अशाच एका अपहरणाच्या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कारस्वार रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतात मात्र पुढे त्यांच्यासोबत अशी फजिती होते की पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी रस्त्याने जात असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक कार तिथे येते आणि मग काही लोक या कारमधून बाहेर पडतात. यांनतर ते मुलाला पकडून गाडीच्या डिक्कीत टाकतात. यादरम्यान, मुलाची गर्लफ्रेंड देखील तेथे उपस्थित असते. ती पटकन तिच्या मेंदूचा वापर करते आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसते. यानंतर काय अपहरणकर्ते काही करतील याआधीच गर्लफ्रेंड गाडी चालवत तेथून आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन पळून जाते. अपहरणकर्ते मात्र हा सर्व प्रकार पाहतच राहतात. व्हिडिओचा असा हा अनोखा शेवट आता अनेकांना हसवण्याचा काम करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक मुलीच्या बुद्धीचे कौतुक करत आहेत.
हा मजेदार व्हायरल व्हिडिओ@pretty.rohee नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. तसेच काहींनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कार पण मिळाली आणि यार पण” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण ते त्या मुलाला का किडनॅप करत होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.