दिल्ली : दिल्लीमधील धक्कादायक अपघात समोर आला आहे. एक भरधाव चार चाकी दुकानात घुसल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील एका प्रसिद्ध कचोरीच्या दुकानात भरधाव वेगात असलेली मर्सिडीज कार धडकली. त्या ठिकाणी काही लोक कचोरी खात उभे असताना त्यांना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात 6 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. कारचा चालक उत्तर प्रदेशचा असून तो नोएडा सेक्टर-79 येथील रहिवासी आहे.
सोशल मीडियावर हा अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला असून चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अपघात करणाऱ्या मर्सिडीज कार चालकाचे नाव पराग मैनी (वय 36 वर्ष) असे आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती ३१ मार्च रोजी मिळाली होती. या घटनेच्या व्हिडीओमध्ये ही कार अचानक दुकानात कशी घुसते हे दिसत आहे. फतेहचंद कचोरी विक्रेत्याच्या दुकानात कार घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Delhi Car Accident: राजापूर रोडवर कचोरीच्या दुकानात घुसली भरधाव कार, अपघातात 6 जण जखमी#Delhi #news #ViralVideos pic.twitter.com/PhU6ILmZwi
— Navarashtra (@navarashtra) April 2, 2024
या व्हायरल व्हिडिओमध्ये ही कार अचानक येऊन धडकताना दिसते. या घटनेत एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेनंतर एक व्यक्ती त्याच्यासोबत आलेल्या महिलेला शोधत असताना व्हिडिओमध्ये दिसते. मात्र, त्या गाडीने धडक दिल्याने ती महिला दुकानाच्या आतमध्ये पडली पडली होती.