(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक वेगवेगळे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे केवळ माणसांचेच नाही काही वन्य प्राण्यांचे व्हिडिओही शेअर होतात. येत्या मुक्या प्राण्यांसोबत अनेक विकृत घटना घडून आल्या, या घटनांचे व्हिडिओही आजवर बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर झाले. आपल्या शुल्लक मजेपुरती मानव आपली सर्व हद्द पार करतो आणि या मुक्या जनावरांना त्रास देऊ पाहतो. आजवर याचे अनेक दाखले आपल्याला मिळाले आहेत. अशातच आता अशीच आणखीन एक घटना समोर आली आहे, ज्यातील दृश्ये पाहता तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. एका श्वानासोबत घडलेली विकृत आणि दुर्दैवी घटना सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात नक्की काय घडलंय ते जाणून घेऊया.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल झाली आहे. यात भारतीय रेल्वेतील काही दृश्ये दिसून आली. वास्तविक, यात कोणीतरी श्वानाला एका पोत्यात भरून, हे पोत जोरदार बांधून घेतलं. यानंतर हे पोत त्या व्यक्तीने ट्रेनच्या डब्यात टाकलं. एका बंद पोत्यात टाकल्याने त्या श्वानाचा श्वास कसा रोखला गेला असेल याचा विचार करा. सुदैवाने हे पोत एका प्रवाशाच्या नजरेस पडलं, त्याने पोत्यात हालचाल झाल्याचे पाहताच पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर ते पोत खोलून श्वानाला त्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
व्हिडिओतून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोलकत्ता रेल्वे स्थानकावरील असून यात श्वानाचा जीव बचावला आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती पोत खोलून श्वानाला बाहेर काढताना दिसून येतो. यावेळी पोलीसही तिथे उपस्थित असतात. या घटनेचा व्हिडिओ @streetdogsofbombay नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने शेअर केला जात आहे. यातील दृश्ये पाहून आता लोक अचंबित झाले असून माणूस इतका कसा क्रूर वागू शकतो असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे तर काहींनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देवाचे आभार, कुत्र्याला ट्रेनमधील देवदूतांनी वाचवले, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माण्साच्या या कृतीचे आता मला अजिबात आश्चर्य वाटत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पोलीस फक्त उभे का आहेत? ते काही मदत का करत नाहीत?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.