दुबई – सध्या आपल्याकडे कडाक्याचा उन्हाळा आहे. मात्र दुबईला मुसळदार पावसाने झोडपले आहे. आपल्याकडे मुंबई पावसाळ्यामध्ये तुंबलेली असते. मात्र दुबईची अवस्था त्याहून अधिक वाईट आहे. वाळवंट म्हणून ओळख असलेल्या दुबईच्या रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. सोशल मीडियावर दुबईतील पावसाची धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर आनंद महिंद्रा यांनी देखील दुबईतील भयानक पावसाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
दुबईत विमानतळ मुसळधार पाऊस, अख्ख आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली#Dubai #dubairain #news pic.twitter.com/FV5Fvvyoz3
— Navarashtra (@navarashtra) April 17, 2024
दुबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामध्ये अख्ख आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळे विमानाचं उड्डान देखील मर्यादीत झाले आहे. त्याचबरोबर हे नक्की विमान आहे की जहाज असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. वर्षभराचा पाऊस अवघ्या काही तासांमध्ये दुबईला झाला आहे. यामुळे दुबईची तुंबई झालेली आहे. शहर पाण्यामध्ये बुडालेली असून ऑफिसमध्ये देखील पाणी घुसलेली आहेत. अतिवृष्टीनंतर दुबईमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जोरदार पाऊसामुळे अनेक शहरांचे पूर्ण कामकाज ठप्प झालं आहे.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिद्रा यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, रस्ते खचाखच पाण्याने भरलेले आहेत. रस्त्यावर गाड्या पाण्यामधून प्रवास करत असल्याचं दिसत आहे. पुलाखाली पाणी साचलेले आहे. नरज पुरेल तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. वाहनांना रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालेलंआहे. आनंद महिंद्रांनी २८ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे.