फोटो सौजन्य: व्हिडीओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज काही काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहून हसू आवरत नाही. तर अनेकदा आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तुम्ही भांडणांचे तर अनेक व्हिडीओ पाहिले असतील. असे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. विशेषत: ट्रेनमधील सीटवरून भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांमध्ये सीटवरून जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही महिला आपापल्या जागेवर हक्क सांगताना एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये असलेली एक महिला तिच्या मुलासोबत ट्रेनच्या वरच्या बर्थवर पडलेली दिसत आहे. त्याचवेळी दुसरी एक महिला तिथे येऊन ती माझ्या सीटवर असल्याचे तिला सांगते. यावरून वाद सुरू होतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला ट्रेनच्या वरच्या बर्थमध्ये तिच्या लहान मुलासोबत झोपलेली आहे. तेवढ्यात त्या ठिकाणी आणखी एक महिला येते आणि ती सीट तिची असल्याचे सांगते. ती म्हणते, ‘ही माझी सीट आहे, कृपया तुम्ही खाली उतरा’ यावर सीटवर बसलेली महिला बोलते ‘मी सीट सोडणार नाही. तुम्ही दुसरीकडे कुठेकरी बसा’ हे ऐकून दुसरी महिला चिडते आणि म्हणते, ‘तुम्ही माझी जागा घेतली आहे आणि आता मला ॲडजस्ट करायला सांगताय. मी कुठे ॲडजस्ट करू?’ या वादादरम्यान दोन्ही महिलांमधील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली.
व्हायरल व्हिडीओ
I applaud to the audacity of those people who occupy reserved seats for other passenger. pic.twitter.com/zgblxL12n3
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) September 18, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ShoneeKapoor अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओ हजारोहूंन अधिक लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक पिवळ्या ड्रेसमधील महिलेचे समर्थन करत आहेत, तर काही लोक हिरव्या ड्रेसमधील महिलेच्या बाजूने बोलत आहेत. तर काही जण कोण चुकीचे असा प्रश्न उपस्थित करत आहेत. एक युजरने म्हटले आहे की, प्रशासनाची चुक आहे. त्यांनी कधीही महिलांना वेटिंगचे तिकीट दिले नाही पाहिजे.