स्किन केअरची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)
प्रदूषणाची वाढती पातळी, वाढता ताणतणाव आणि त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांचा अतिवापर यामुळे भारतीयांमध्ये संवेदनशील त्वचेची समस्या वाढत आहे. प्रत्येकाने आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तिची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डॉ. शरीफा चौसे, त्वचारोगतज्ज्ञ, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी
का वाढतेय त्वचेची समस्या
संवेदनशील त्वचा ही आता दुर्मिळ समस्या राहिलेली नाही. यामध्ये त्वचेचा लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ होणे, त्वचेचा कोरडेपणा, घट्टपणा,खपलीयुक्त त्वचा आणि अचानक ब्रेकआउट्स सारख्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे, ज्यांना पूर्वी कधीही त्वचेची समस्या नव्हती अगदी अशा लोकांमध्येही ही समस्या वाढल्याचे दिसून येते. पूर्वी वापरत असलेल्या उत्पादनांवर अचानकच त्वचेची वेगळी प्रतिक्रिया दिसून येऊ शकते.
काही लोकांना सूर्यप्रकाशात वावरताना किंवा चेहरा धुतल्यानंतर मुरुमे, पुरळ किंवा त्वचेची जळजळ जाणवते. म्हणूनच, त्वचेच्या काळजीवर लक्ष केंद्रित करण्याची आणि त्वचेची संवेदनशीलतेसारख्या समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. वायू प्रदूषणामुळे त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते. धूळ, धूर आणि हानिकारक कण त्वचेचे नुकसान करतात, ज्यामुळे त्वचा अधिक प्रतिक्रियाशील बनते.
काय आहेत कारणे?
वाढता ताणतणाव, अनियमित झोप, हार्मोनल बदल,चुकीचा आहार, निर्जलीकरण, अतिनील किरणे, एक्झिमा आणि रोसेसिया सारख्या परिस्थिती आणि वाढत्या स्क्रीन टाईममुळे त्वचेचे नैसर्गिक संतुलन बिघडतो. अनेक स्किनकेअर उत्पादनांची सवय, वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय वारंवार एक्सफोलिएशन केल्याने देखील त्वचेच्या संरक्षणात्मक थराचे नुकसान होते, ज्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. सुगंधित साबण, अल्कोहोल-आधारित टोनर आणि तज्ञांच्या सल्ल्याशिवाय वारंवार कॉस्मेटिक उपचारांचा वापर केल्यास त्वचेचे नुकसान आणखी वाढू शकते.
सौम्य, वैद्यकीयदृष्ट्या चाचणी केलेल्या उत्पादनांचा वापर केल्यास त्वचेचे नुकसान टाळता येते. त्वचेच्या समस्या दुरुस्त करण्यासाठी, त्वचेची जळजळ दूर करण्यासाठी आणि कालांतराने सहनशीलता सुधारण्यासाठी योग्य स्किनकेअर दिनचर्येचे पालन करणे फायदेशीर ठरेल. स्वतःहून कोणत्याही रासायनिक उत्पादनांचा वापर करणे टाळा आणि तज्ज्ञांची मदत घ्या.
संवेदनशील त्वचेसाठी खालील स्किनकेअर टिप्स फॉलो करा






