फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. तुम्ही आत्तापर्यंत डान्सचे, कपल्सचे, तसेच जुगाड करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असती. असे अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा बॉलीवुड सेलिब्रेटींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांची मिमिक्री करणारे, आणि त्यांच्यासारखे दिसणाऱ्यांचे तर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अशाच एका बॉलीवुड अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौनतच्या मिमिक्रीचा हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे एका पाकिस्तानी महिलेने तिची हुबेहुब नक्कल केली आहे. सोशल मीडियावर या महिलेची प्रशंसा होत आहे. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या पाकिस्तानी महिलेने कंगणा रणौतच्या क्कीन चित्रपटातील राणी या भुमिकेची मिमिक्री केली आहे. एका पाकिस्तानी टिव्ही शो मध्ये तिने मिमिक्री करून दाखवली आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तानातील लोकप्रिय टीव्ही शो टाईम विथ रमिझ चालू आहे. या शोमध्ये एक पाकिस्तानी महिला कंगना राणौतची नक्कल करत आहे. कंगना मिमिक्रीच्या जगात सर्वाधिक कॉपी केलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, महिला राणौतची “क्वीन” चित्रपटातील भूमिका करत आहे. ती महिला रणौतच्या कथनातील बारीकसारीक गोष्टींची नक्कल करण्याचा प्रयत्न करते. तिची नक्कल पाहून तिथे उपस्थित पाहुणे हसत आहेत आणि तिची प्रशंसा करत आहेत. व्हिडीओ सर्व सोशल मीडियाप्लॅटफर्मवर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
पाकिस्तानियों…तुम्हारी हिम्मत कैसे हुई कँगना रनौत की मिमिक्री करने की 😂😂#KanganaRanautpic.twitter.com/8ZkkQYyDIY
— 🇮🇳 Vishal JyotiDev Agarwal (@JyotiDevSpeaks) September 17, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल व्हिडीओ एक्सवर@JyotiDevSpeaks अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘कंगना बद्दल असे काही आहे की तिला पाकिस्तानी देखील फॉलो करतात’, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तीने खूप छान नक्कल केली, तर आणखी एका युजरने म्हटले की, ‘कंगना भारतात, विशेषतः उत्तराखंड आणि आता पाकिस्तानमध्येही प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या देशांतील लोक त्यांची नक्कल करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.’ एका यूजरने कंगनाच्या क्वीन चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले की, तुम्ही क्वीनची निर्मिती करू शकत नाही, मिमिक्री हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे.