सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यातील अनेक गोष्टी कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. यात अनेकदा काही प्राण्यांचे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. सध्या अशाच एक धोकादायक प्राण्याच्या जन्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण भयभीत झाले आहेत.
तुम्ही अनेक प्राण्यांना मुलांना जन्म देताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी किंग कोब्राला जन्म घेताना पाहिलं आहे का? जर नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या कोब्राचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. या व्हिडीओवर कमेंट करताना लोकांनी सांगितले की, प्रत्येक प्राण्याची पिल्ले गोंडस दिसतात पण या बेबी कोब्राला पाहिल्यानंतर भीतीने अंगाचा थरकाप होत आहे.
हेदेखील वाचा – मूर्ती लहान पण कीर्ती महान! बिबट्याने हल्ला करताच चिमुकल्या बदकाने लढवली शक्कल, Video पाहून सर्वच थक्क
व्हिडिओमध्ये पाहिले तर दिसते की, एका व्यक्तीने हातात किंग कोब्राचे अंडे घेतलेले दिसत आहे. व्हिडिओमध्ये लहान साप अंड्यातून पूर्णपणे बाहेर निघताना दिसत आहे. यात बेबी कोब्रा आपली जीभ बाहेर काढताना दिसत आहे. एका नवजात कोब्राला हे करताना पाहून लोक भीतीने थरथर कापू लागले. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर, बेबी कोब्रा पुढे मागे फिरत आहे. व्हिडिओमध्ये बेबी कोब्राची चपळता पाहून लोक थक्क झाले, तर अनेकांना हे दृश्य भीतीदायक वाटले. किंग कोब्राच्या जन्माचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
The birth of a baby cobra pic.twitter.com/DA8PnbGv1Y
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 15, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. दरम्यान आम्ही तुम्हाला सांगतो की किंग कोब्रा हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. जे आपल्या विषाने हत्तीलाही मरण देऊ शकते.