फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सध्या इंटनेटच्या दुनियेत व्हायरल होण्यासाठी विचित्र कंटेंट तयार करतात. पण काही असे लोक असतात जे सोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी, लोकांनी त्यांनी लाईक करण्यासाठी देखील लाखो रूपये खर्च करतात. सध्या सोशल मीडियावर फेमस असलेल्या एका ब्यूटी इमनफ्लूएंसरने तिच्या सुंदर दिसण्याचे रहस्य सांगितले आहे.
सोशल मीडियावर तिच्या जबरदस्त लुक्स आणि कॉमेडी व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेली मिया डिओ म्हणते की तिला तिच्या सौंदर्यासाठी 32 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 680,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती म्हणते की लोकांनी स्वतःची तिच्याशी तुलना करू नये, कारण तिच्या सौंदर्याची किंमत खूप जास्त आहे. मिया फक्त 22 वर्षांची आहे, परंतु तिचे चाहते तिला “देवाची आवडती” म्हणतात. तिने कबूल केले आहे की तिचे सौंदर्य तिच्या चांगल्या जीन्सपेक्षा तिच्या सर्जनमुळे जास्त आहे. एका व्हिडिओमध्ये, मियाने ती “खूप सुंदर” आणि “भाग्यवान” असल्याचा दावा करणाऱ्या टिप्पण्यांवर प्रत्युत्तर दिले आहे.
लाखो रूपये खर्च
प्लॅस्टिक सर्जरीवरील खर्चाची माहिती मिया ने दिली आहे. ती म्हणाली, “वयाच्या 17 व्या वर्षी नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी 5 लाख 17 हजार रुपये, वयाच्या 19 व्या वर्षी 5 लाख 90 हजार रुपये, वयाच्या 20 व्या वर्षी स्तन वाढवण्यासाठी 7 लाख रुपये.’ पर्सनल ट्रेनिंगसाठी 2 लाख 15 हजार रुपये आणि मेकअपसाठी 6 लाख 44 हजार रुपये खर्च तिने केला आहे. मियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, सोशल मीडियावर जे दिसते ते सगळेच खरे नसते. काही वेळा तुम्हाला लाईक करणारे लोक देखील. असेही ती म्हणते.
हे देखील वाचा- घराबाहेर बिबट्या आणि ब्लॅक पँथर; हर्ष गोएंका यांनी शेअर केला व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लाकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी तिने याबद्द मोकळपणाने बोलल्यामुळे तिचे कौतुक केले आहे. एका युजरनेने लिहिले की, तुम्ही मोकळेपणाने बाललात याबद्दल तुमचे कौतुक करतोआणि प्रत्येकाने हे समजून घेणे आवश्यक आहे.’ आणखी एकाने म्हणले आहे की, ‘आम्हाला खरे बोलणारे लोक आवडतात’ तर तिसऱ्याने विनोद केला, “मी कुरूप नाही, मी गरीब आहे.”