TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश... 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज
Apple Event 2026: अखेर तो क्षण आलाच… iPhone 17e ची धमाकेदार एंट्री, MagSafe आणि A19 चिपने सुसज्ज
TECNO चं असं म्हणणं आहे की, CAMON 50 Ultra 5G किंमत आणि उपलब्धता विविध स्मार्टफोन मार्केटमध्ये लवकरच घोषित केली जाणार आहे. हा नवीन स्मार्टफोन केवळ पावरफुलचं नाही तर अतिशय मजबूत देखील आहे. फोनमध्ये IP68, IP69, IP69K रेटिंग आहे. या फोनमध्ये MIL-STD-810 मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी देखील आहे. (फोटो सौजन्य – TECNO)
कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, CAMON 50 Ultra 5G मध्ये 6.78-इंच 1.5K कर्व्ड AMOLED डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, प्रोएक्सडी आय केअर टेक्नोलॉजी आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शन दिले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 अल्टिमेट (4nm) चिपसेट दिला आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. कमी प्रकाशात कामगिरी सुधारण्यासाठी या डिव्हाइसमध्ये 1/1.56-इंच आकाराचा 50 मेगापिक्सेल सोनी LYT-700C प्रायमरी सेन्सर (OIS सह) आहे.
यासोबतच कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये
डिव्हाईसमध्ये 50MP Sony LYT-700C प्राइमरी सेंसर (OIS सह), 1/1.56-inch साइज के साथ बेहतर लो-लाइट परफॉर्मेंस देता है। साथ ही फोन में 50 MP टेलीफोटो लेंस आहे, जो 3x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड लेंस वाइड शॉट्ससाठी दिले आहे.
Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
इमेजिंग अधिक चांगले करण्यासाठी, फोनमध्ये AI 60x सुपरझूम आणि सुपर-झूम फ्लॅशस्नॅप सारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जे दूरवरून देखील विषय स्पष्ट ठेवण्यास मदत करतात. या फोनमध्ये लाईव्ह फोटो आणि अंडरवॉटर फोटोग्राफी मोड सारखे फीचर्स देखील आहेत. यात 6500mAh बॅटरी देखील आहे आणि 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.






