(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यात काही विचित्र गोष्टी देखील व्हायरल होत असतात. या अजब-गजब गोष्टी नेहमीच आपल्याला थक्क करून जातात. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अनेक कार्यक्रम, लग्नसोहळे किंवा पार्टीजमध्ये डान्स परफॉर्मन्स ठेवले जातात. हे डान्स परफॉर्मन्स लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. आजकाल लहान सहन कार्यक्रमातही आयटम डान्सचे आयोजन केले जाते, जिथे तरुणी अर्धनग्न कपडे परिधान करून सर्वांसमोर नृत्य प्रदर्शित करू लागतात. हा प्रकार आजकल दुपटीने वाढू लागला आहे.
लोकांचे वाढदिवस असो वा राजकीय नेत्यांची सभा लोक प्रत्येकच जागी अशा नृत्य प्रदर्शनाचे आयोजन करतात. मात्र आता तर हद्दच झाली, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून एक धक्कादायक प्रकार समोर आला. यात एक तरुणी चक्क आजी-आजोबांच्या शोकसभेतच अश्लील डान्स करताना दिसून आली. शोकसभेला आलेल्या लोकांसमोर हा सर्व प्रकार घडला. या सर्व प्रकारचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आणि आता याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत नक्की काय घडलं? चला जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक शोकसभेचा कार्यक्रम सुरु आहे. या शोकसभेत एक स्टेज तयार करण्यात आला असून या स्टेजवर एक तरुणी आयटम सॉंगवर नाचताना दिसून आली. स्टेजच्या पाठी यावेळी आजी-आजोबांचा फोटो देखील लावण्यात आला होता ज्यावर, ‘श्रद्धांजली सभा’ असे लिहिण्यात आले होते . या बॅनरसमोर ही तरुणी यावेळी अश्लीक नृत्य करताना दिसून आली. मुख्य म्हणजे, यावेळी तेथे उपस्थित सर्वजण या गोष्टीचा आनंद लुटताना दिसून आले. काही लोक तर तरुणीच्या जवळ जाऊन तिचा व्हिडिओ देखील काढत होते तर अनेकजण बसून या सर्व प्रकाराला प्रोत्साहन देत होते.
या आगळ्या-वेगळ्या शोकसभेचा व्हिडिओ @ahirani.memer नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मी कसली श्रद्धांजली आहे?’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या सर्व प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आज ते जिवंत असता तर पुन्हा मेला असता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “श्रद्धा आणि अंजली एकत्र आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.