रविवार, ८ जानेवारी रोजी लंडनमध्ये १२ वा नो पॅन्ट डे (No Pants Day) साजरा करण्यात आला. अनेक प्रवाशांनी भूमिगत रेल्वेतून प्रवास करताना ट्राऊजर (Trouser) किंवा पँट (Pant) न घालता प्रवास (Travel) केला. द स्टिफ अप्पर लिप सोसायटी यांच्यातर्फे हा उपक्रम घेण्यात येत असतो.
न्यू यॉर्कमध्ये २००२ साली Improv Everywhere या गटाने नो पँट सबवे राईड हा उपक्रम सुरु केला होता. त्यानंतर जगातील ६० देशांमध्ये हा उपक्रम घेण्यास सुरुवात केली. या दिवसाची संकल्पना असी आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही फक्त अंडरवेअरवर प्रवास करायचा आहे. फक्त मजा म्हणून या दिवसाची सुरुवात झाली.
[read_also content=”लिफ्टमध्ये केलेली मस्ती आली अंगाशी, महिलेला पाहून सुरु केलेल्या चाळ्यांचा VIDEO चं आला समोर, आता जेलवारी पक्की ? https://www.navarashtra.com/crime/navi-mumbai-crime-a-case-has-been-registered-against-a-young-man-who-committed-obscene-acts-on-seeing-a-woman-nrvb-360484.html”]
Improv Everywhere यांच्या वेबसाइटनुसार, सात जणांनी मिळून मस्करीत हे अभियान सुरु केले होते. ही मस्करी आता देशातील अनेक देशांत पोहोचली आहे. लंडनमध्ये रविवारी पार पडलेल्या नो पँट डेचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूमिगत ट्रेनमध्ये, तिकीट खिडकीवर आणि पायऱ्या उतरताना लोकांनी पँट घातलेली दिसत नाही.
[read_also content=”सावधान! नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी धोका वाढविणारी बातमी; एकेक घास करू शकतो घात, का मिळू शकतं मृत्यूला निमंत्रण? वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/technology/it-happens-india-also-antibiotics-to-animals-raise-superbug-risk-by-creating-antimicrobial-resistance-to-non-veg-lovers-ntc-nrvb-360469.html”]
पण हे करत असताना, आपण खाली काही घातलेलं नाही याची काळजी न करता नेहमीप्रमाणे वागायचं असतं. लंडनमध्ये नो पँट डे साजरा करण्यासाठी सोशल मीडियावरुन आधीच आवाहन करण्यात आले होते. पँटलेस गँग या नावाने चिनाटाऊन स्टेशनवर भेटून मग पुढे ठरलेल्या ट्रेनने विना पँट प्रवास करायचा बेत एका ग्रुपने ठरवला होता.