एकाच पत्नीचे 15 पती, पंजाबहून इंग्लंडला पोहोचले सर्व जण मग कथेत आला एक अनोखा ट्विस्ट; पाहून पोलिसही थक्क ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Punjab fake marriage racket : पंजाबमध्ये घडलेला एक फसवणुकीचा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही घटना ऐकली की क्षणभर कोणालाही वाटेल “हे खरंच घडलंय का?” कारण या कथेत एकाच स्त्रीचे १५ पती असल्याचे समोर आले आणि या धक्कादायक प्रकरणामुळे इंग्लंडपासून पंजाबपर्यंत खळबळ माजली आहे. एका जोडप्याने इमिग्रेशन कंपनीच्या आडून अशी खेळी केली की, एका निष्पाप महिलेच्या नावावर १५ खोटे पती बनवून ते सर्व तरुण इंग्लंडमध्ये पाठवले. इतकंच नाही, या खेळाचा बळी ठरलेल्या महिलेची अटक इंग्लंडमध्ये झाली आणि तिच्या पतीचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले.
आलमपूरचे रहिवासी भिंदर सिंग यांची पत्नी इंग्लंडमध्ये राहते. भिंदरला आपल्या मुलासह तिकडे जायचे होते. पत्नीने त्याला स्पॉन्सरशिपही पाठवली. त्यानुसार भिंदरने पंजाबमध्ये चालणाऱ्या एका इमिग्रेशन कंपनीकडे अर्ज दाखल केला. या कंपनीचे संचालन प्रशांत आणि त्याची पत्नी रूबी करत होते. त्यांनी भिंदरकडून तब्बल ५ लाख ९० हजार रुपये घेतले. काही महिन्यांनी व्हिसा मिळेल, अशी आशा भिंदरला दाखवण्यात आली. मात्र, अचानक त्याला कळवण्यात आलं की त्याचा व्हिसा प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. हे ऐकून तो धक्का बसला. पण खरी धक्का देणारी घटना अजून बाकी होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NASA : लाखोंच्या जीवाला धोका! अमेरिकेतील ‘ही’ सर्व शहरे भीषण संकटात; नासाचा ट्रम्प यांना त्वरित कारवाईचा सल्ला
जेव्हा भिंदरचा व्हिसा नाकारला गेला, तेव्हा तपास करताना समोर आलं की इंग्लंडमध्ये त्याच्या पत्नीवर कारवाई झाली आहे. कारण तिच्या कागदपत्रांचा वापर करून तब्बल १५ वेगवेगळ्या तरुणांना तिचा पती दाखवत इंग्लंडला पाठवण्यात आले होते. क्षणभरासाठी ही गोष्ट ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. कारण कागदपत्रांनुसार एका स्त्रीचे १५ पती असल्याचे दिसत होते. पण प्रत्यक्षात ती महिला निर्दोष होती. तिला या घडामोडींची काहीच माहिती नव्हती. तिच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून ही संपूर्ण फसवणूक करण्यात आली होती.
इंग्लंडमध्ये भिंदरची पत्नी अडचणीत सापडली. तिच्याविरुद्ध तपास सुरू झाला. हे ऐकून भिंदर हादरून गेला. त्यानंतर त्याने सविस्तर चौकशी केली असता, प्रशांत आणि रूबी यांनी त्याच्याकडून घेतलेले कागदपत्रे दुरुपयोग करून हा घोटाळा रचल्याचे स्पष्ट झाले. या जोडप्याने फक्त भिंदरच नव्हे, तर इतर अनेक लोकांची कागदपत्रे वापरून बनावट नोंदी तयार केल्या होत्या. त्या आधारे तरुणांना इंग्लंडसारख्या देशात पाठवले जात होते. भिंदरने राजपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ प्रशांत आणि रूबी यांच्याविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
साधारणपणे व्हिसा फसवणुकीत बनावट नोकरीची कागदपत्रे, बँक स्टेटमेंट्स किंवा शिक्षणाचे दाखले सादर केले जातात. पण या प्रकरणात फसवणूक करणाऱ्यांनी एका स्त्रीच्या ओळखपत्रांचा असा गैरवापर केला की ती एका क्षणात ‘१५ पतींची पत्नी’ ठरली. या प्रकारामुळे पंजाबमधील लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भिंदर सिंगचे म्हणणे आहे, “माझी पत्नी निर्दोष असून तिचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. मात्र तिच्या नावावर हे घोटाळे घडल्याने तिला इंग्लंडमध्ये अटक झाली. मी न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही.” त्याच्या या विधानावरूनही लोकांना फसवणुकीचे गांभीर्य लक्षात येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी अनेक लोकांकडून पैसे उकळले आहेत. किती लोकांना अशा प्रकारे फसवण्यात आलंय, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे पंजाबमधील इमिग्रेशन कंपन्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. एका कुटुंबाच्या स्वप्नांवर पाणी फेरत, बनावट पतींच्या माध्यमातून १५ तरुणांना इंग्लंडला पोहोचवण्याचा हा घोटाळा म्हणजे पंजाबमधील सर्वात धक्कादायक प्रकरणांपैकी एक आहे. भिंदर सिंगच्या कुटुंबाला यातून न्याय मिळेल का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.