(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्रयागराजमधील कुंभ मेळ्याला काही दिवसांपासून सुरवात झाली आहे. हा देशातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणून ओळखला जातो. देशातूनच काय तर जगभरातून लोक या कुंभमेळ्यात सामील व्हायला प्रयागराजमध्ये येत असतात. याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर येत असतात. यावेळच्या कुंभ मेळ्यातील अनेक साधू, साध्वी यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच आता सोशल मीडियावर या मेळाव्यातील एका सुंदरीचा व्हिडिओ फार ट्रेंड करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर माळा विकणाऱ्या एका सुंदर तरुणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात अनेकजण तिच्या सुंदरतेवर भाळून तिच्याकडे एका सेल्फीची मागणी करताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ फार चर्चेत असून नेटकरी मात्र यावर फार भडकले आहेत. नक्की यात काय घडले ते जाणून घेऊयात.
काय सांगता! आता पुणे मेट्रोने जाता येणार स्वर्गात? रेल्वे स्थानकावरील धक्कादायक Photo Viral
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, यात कुंभमेळ्यातील या सुंदर मुलीच्या आजूबाजूला गर्दी जमलेली दिसत आहे. एका सेलिब्रिटींच्या आजूबाजूला जशी गर्दी करावी तशी गर्दी यावेळी लोकांनी या तरुणीभोवती केलेली दिसून येते. त्यातच एक माणूस “तुम्ही कुठल्या आहात” असा प्रश्न त्या तरुणीला विचारतो, यावर ती “इंदौर” असे उत्तर देते. यावर तो माणूस तिला म्हणतो “तुमचं इन्स्टाग्राम, फेसबुक आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर ती, “हो” असे देते. मग तो माणूस तिला म्हणतो, “मग तर तुम्ही आता फेमस झालात , तुमचे फॉलोवर्स वाढतील तर तुम्हाला त्याचा फायदाच आहे ना, आज तुम्ही माळा विकताय, उद्या तुम्ही कोटी रुपये कमवाल, मग ही चांगली गोष्ट आहे ना?” यावर मुलगी एक स्मितहास्य देते आणि तेथून निघून जाते.
यावेळी अनेकजण तरुणीचा व्हिडिओ अथवा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतानाही दिसतात. मुख्य म्हणजे, तरुणी तेथून निघून गेल्यानंतरही लोक तिचा पिच्छा सोडत नाही आणि तिच्या मागेमागे जाऊ लागतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत असून नेटकरी मात्र या प्रकारावर फार भडकले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ @shivam_bikaneri_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिला त्रास देणं बंद करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्ही नक्की कुंभ मेळा बघायला गेला आहेत कि मुली बघायला?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.