(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. येथील व्हायरल गोष्टी अनेकदा लोकांना थक्क करून जातात. इथे अनेक विचित्र प्रकार, काही धक्कादायक स्टंट्स तर कधी थरारक अपघात देखील व्हायरल होत असतात. लोक या गोष्टी पाहून अनेकदा हादरतात आणि मग अशा गोष्टी शेअर करू लागतात. यातच या गोष्टी व्हायरल होऊ लागतात. येत्या काळात पुण्यातील अनेक व्हिडिओ किंवा फोटो, पुणेरी पाट्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच आता आणखीन एका फोटोची यात भर पडली आहे. यातील दृश्ये नक्कीच तुम्हाला कोड्यात टाकतील.
मृत्यूंनंतर स्वर्गात किंवा नरकात जाता येते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल मात्र जिवंतपणी मेट्रोने स्वर्गात जाण्याचा प्रकार कधी तुम्ही ऐकला आहे का? सध्या असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याची चर्चा आता सर्वत्र रंगत आहे. हा व्हायरल फोटो पुणे रेल्वे स्थानकावरील आहे ज्यात एका स्क्रीनवर ‘स्वारगेट’ स्थानकाचे मराठी भाषांतर ‘स्वर्गात’ असे केल्याचे दिसून आले आहे. स्थानकाचे हे चुकीचे भाषांतर आता सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड करत असून लोक याची फार मजा लुटत आहेत.
काय दिसत आहे व्हायरल फोटोत?
खरंतर हा एक जुना फोटो आहे, जो पुन्हा सोशल मीडियावर शेअर करून व्हायरल करण्यात आला आहे. फोटोमध्ये रेल्वे स्थानकावरील एक स्क्रीन दिसून येत आहे. या स्क्रिनवर मार्ग क्रमांक, स्थळ, दरवाजा आणि अपेक्षित वेळ इत्यादी माहिती देण्यात आली आहे. याच स्क्रीनवर स्वारगेट स्थानकाचे स्वर्गात असे चुकीचे मराठी भाषांतर करण्यात आले आहे, जे पाहून नेटकरी आता याची खिल्ली उडवत आहेत. या चुकांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आता ‘पुणे मेट्रोने स्वर्गात जाता येणार’ असे पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.
पुणे मेट्रोतून थेट स्वर्गात… #Metro #Pune @PuneMetro pic.twitter.com/CNE60GKGWj
— Amol kakade (@Amolkak84455074) January 17, 2025
दरम्यान हा व्हायरल फोटो @Amolkak84455074 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुणे मेट्रोतून थेट स्वर्गात…’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी या घटनेची दखल घेत कमेंट्समध्ये यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खरंतर स्वर्गात जायचं मार्ग पुण्यातूनच आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा खूप जुना फोटो आहे”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.