माणूस आहे की राक्षस? जिवंत ऑक्टोपसला चावून चावून चटकारे घेत खाल्ले; व्हिडिओ लोक म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच यामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर तुम्हाला परदेशातील अनेक गोष्टींची माहिती सोशल मीडियामुळे मिळते. तुम्हाला माहितच असेल, जपान, दक्षिण कोरिया, इटली, स्पेन यांसारख्या देशांमध्ये लोक अंडी, चिकन मासे, मटण यांशिवाय समुद्रातील इतर जीवांनाही खातात. अगदी झुरळ, पाली, छोटे किडे खाताना देखील दिसतात. सहसा तुम्ही या लोकांना हे सर्व शिजवून खाताना पाहिले असेल. हे पाहून अनेकदा आपल्याला उलटीसारखे होते. आपल्या देशातही लोक अंडी, मासे, मटण-चिकन खातात. परंतु जपाना, दक्षिण कोरिया हे देश जरा जास्तच धाडसी आहेत. समुद्रातील भयानक जिवांना खातानाही त्यांना कोणती भीती वाटत नाही. अगदी आरामात खात असतात, ज्याची आपण कल्पना देखील केली नसेल.
सध्या सोशल मीडियावर एक वेगाळाच व्हिडओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती जिंवत ऑक्टोपसला खाताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने हातातमध्ये एक शंख धरला आहे. त्याच्यामध्ये तो पाणी टाकताना दिसत आहे. यावेळी पाणी टाकत असताना एक बेबी ऑक्टोपस बाहेर येतो. ऑक्टोपरस डोके बाहेर काढताचा व्यक्ती त्याला थेट तोडांत टाकतो आणि चावून खावून लागतो. यावेळी ऑक्टोपस त्याच्या तोडांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
I want him in jail before 6pm today 🤧🤧 pic.twitter.com/M5oqzqT73B
— The Instigator (@Am_Blujay) September 7, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Am_Blujay या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी म्हटले आहे की, प्लीज हा AI व्हिडिओ असावा, असे कोणी जिंवत प्राणी कसे खाऊ शकते असे म्हटले आहे, तर काही लोकांनी हे काहीच नाही यापेक्षाही भयानक प्राणी खातात हे लोक असे म्हटले आहे. तर काहींना जपानी लोक मानव नाही राक्षस आहेत राक्षस असे म्हटले आहे. सध्या व्हिडिओ पाहून लोकांच्या अंगावर काटा आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.