पत्रकाराच्या घरावर बॉम्ब हल्ला; पण पाळीव श्वानामुळे वाचला जीव, चावून चावून केले स्फोटकाचे तुकडे, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
असे म्हणतात कुत्रा हा माणसाचा सगळ्यात वफादार पाळीव प्राणी असतो. ही लाईन जेवढी क्लिशे वाटते तेवढीच तार्किक आहे. यामुळे श्वानाला कुटुंबातही अगदी सदस्याप्रमाणे स्थान दिले जाते. श्वान आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीवही धोक्यात घालतात, असे अनेकजण म्हणतात. सध्या याचे एक उदाहरणही पाहायला मिळाले आहे. पेरुमध्ये ही घटना घडली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, पेरुमध्ये एका पत्रकाराच्या घरी डायनामाइटचा हल्ला करण्यात आला होता. पण त्याच्या पाळीव श्वानामुळे पत्रकाराचा जीव वाचला. श्वानाने आपल्या जीवाची पर्वा न करता, डयनामाइट खाल्ला. यामुळे पत्रकार आणि त्याचे संपूर्ण कुटुंबा वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार कार्लोस अल्बर्टो मेसियास झारेटच्या घरी ही घटना घडली. कार्लोस आपली कुत्री कॉकर स्पॅनियल मिक्स सोबत राहत होता.तिचे नाव मुन्चीज होते. पत्रकाराने दावा केला आहे की, त्याच्या इनव्हेस्टिगेटिंग रिपोर्टींगमुळे त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता, त्याच्या घरामध्ये डायनामाइट बॉम्ब फेकण्यात आला. यावेळी त्याच्या कुत्रीने मुन्चीजने हे पाहिले. तिने तातडीने पळत जाऊन डायनामाइट तोडांत धरला आणि चावून त्याला निष्क्रिय करुन टाकले. सध्या मुच्नीजच्या या पराक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
This is Manchis. When someone threw a stick of dynamite into the entryway of her home earlier this week, she miraculously extinguished the lit fuse with her teeth before it detonated, preventing a massive tragedy. But she’s not a trained bomb-sniffing dog or a K-9 unit with the… pic.twitter.com/VW30A5zlzN
— WeRateDogs (@dog_rates) August 27, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dog_rates या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर श्वानाचे कौतुक केले आहे. गेले काही दिवस कुत्र्याच्या लोकांवरही हल्ल्याचे व्हिडिओ पाहायला मिळत होते, पण या व्हिडिओमुळे श्वान प्रेमींना आंनद झाला आहे. एकाने म्हटले आहे की, कुत्रा कधीही कोणवर विनाकरण हल्ला करत नाही, जोपर्यंत त्याला त्रास दिला जात नाही. तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, म्हणूनच लोक श्वानाला घरातील सदस्य मानतात, तर आणखी एकाने मानवाचा सर्वात निष्ठावंत मित्र हा कुत्राच असतो असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.