(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत सैनिकांची एक तुकडी हेलिकाॅप्टरच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. यावेळी त्यांच्यासोबत लष्करी कुत्रा देखील असतो. जसे त्यांचे गंतव्यस्थान येते तसे एक एक सैनिक पॅराॅशूटच्या मदतीने आकाशात झेप घेत जमिनीवर लँडींग करु लागतात. याचवेळी त्यांच्यासोबत असलेला श्वान देखील हजारो फूड उंचावरुन सैनिकाच्या सोबतच आकाशात झेप घेतो. यावेळी तो घाबरत नाही आणि आपल्या सैनिक मित्राला सहकार्य करतो. श्वानाचे हे धाडस आता यूजर्सना चांगलेच थक्क करत आहे. हा व्हिडिओ कझाकस्तानमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याचे नाव अरिशा असे होते आणि तो प्रशिक्षकासोबत विमानातून पॅराशूटने खाली उतरत होता. हा श्वानाच्या प्रशिक्षणाचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.
हे लक्षात घेतले पाहिजे की, विशेष दलातील कुत्र्यांना अनेक कठीण मोहिमांसाठी तयार केले जाते आणि त्यांना असे प्रगत प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते सर्व परिस्थितीत आपल्या टीमसोबत काम करू शकतील. हा व्हिडिओ @gdnonline नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या श्वानाच्या या कर्तबाविषयी आपले मत व्यक्त केला आहे. यात एका यूजरने म्हटले की, “अरे व्वा… त्याचा आत्मविश्वास आणि शांतपणा तर अविश्वसनीय आहे… तो इतका निवांत आहे की, जणू काही कामावरचा एखादा नेहमीसारखाच कंटाळवाणा दिवस आहे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरोखरच अप्रतिम” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आश्चर्यकारक आहे की तो घाबरला नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






