फिरायला गेलेल्या पर्यटकांवर अचानक कोसळला डोंगर, तलावात पुढे जे घडले... कल्पनाही करवणार नाही, Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगेवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील दृश्ये अनेकदा इतकी थरारक अथवा विचित्र असतात की पाहून सर्वांनाच धक्का बसतो, हेच कारण आहे की फार कमी वेळेत हे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पर्वताचा एक भाग पर्यटकांवर अंगावर कोसळताना दिसत आहे. हे दृश्य इतके भयानक आहे की पाहूनच आता अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं ते जाणून घेऊयात.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, इथे एका सुंदर तलावात पर्यटक आपला मोकळा वेळ घालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तलावात बोटींगचा आनंद घेण्यात ते व्यस्त होते. आजूबाजूचे वातावरण अगदी सामान्य होते. अचानक डोंगराचा मोठा भाग तलावात कोसळतात आणि सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होते. ही घटना पाहता अनेकांना या दुर्घटनेचा फटका बसल्याचे दिसून येते. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेवर आता अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
व्हायरल झालेला व्हिडिओ खूपच भयानक आणि गंभीर दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ एडिट करण्यात आला असावा, असे अनेक नेटकऱ्यांचे मत आहे. ही घटना खरी आहे की काय अशी शंका सोशल मीडियावर लोक व्यक्त करत आहेत. काही युजर्सनी व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगितले की, डोंगर कोसळणे आणि त्याचा वेग इतका अनैसर्गिक आहे की जणू तो एखाद्या चित्रपटाचा किंवा संपादित क्लिपचा भाग आहे. इंटरनेटवर अशा चर्चा वेगाने पसरत आहेत, ज्यामध्ये लोक या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तथापि, यात दिसून आलेले हे दृश्य खूपच भितीदायक वाटते. या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @motivation__line__daily नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘फिरायला गेलेल्या पर्यटकांवर अचानक डोंगर कोसळला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, ते पापी लोक होते, म्हणून निसर्गानेही त्यांच्यासोबत असे केले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देव त्यांना सुरक्षित रखो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.