टाइम ट्रॅव्हलविषयी तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल. याबद्दल अनेक लोक वेगवगेळ्या प्रकारचे दावे करतात. काही लोक याला वास्तविकता मानतात तर काही याला केवळ एक अफवा असल्याचे सांगतात. मात्र यामागचे खरे काय, हे कोणालाच ठाऊक नाही. आजवर कोणीही टाइम ट्रॅव्हल केले नाही किंवा ऐकले नाही. शास्त्रज्ञांच्या दाव्यांवर विश्वास ठेवला तर हे लक्षात येते की, सध्या टाइम ट्रॅव्हल करणे शक्य नाही, परंतु भविष्यात ते शक्य होईल. तथापि, वर्षानुवर्षे लोक याच्या संबंधित कथा सांगत आहेत. पण फ्लाइटशी संबंधित एक घटना इतकी रंजक आहे की ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल.
आज आम्ही तुम्हाला सांगत असलेली गोष्टदेखील टाइम ट्रॅव्हलवर (American flight time travel) आधारित आहे. ही एका सत्य घटनेवर आधारित कथा आहे, जिला अनेकजण आजवर खरी समजतात. या घटनेसंबंधी अनेक बातम्या बनवल्या गेल्या मात्र या रहस्यमयी घटनेमागचे सत्य काहीतरी वेगळेच आहे.
न्यूज एजन्सी AFP च्या 2021 च्या रिपोर्टनुसार, केनिया आणि भारत सारख्या देशांमध्ये फ्लाइट 914 बद्दल खूप चर्चा आहे. याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या, ज्यामध्ये या फ्लाइटची माहिती देण्यात आली होती. प्रथम आपण या फ्लाइट वरून काय दावे करण्यात आले हे जाणून घेऊयात, त्यानंतर आम्ही तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण सत्य सांगू.
हेदेखील वाचा – Viral: स्वतःवर गोळी झाडत भारतीय कॉन्स्टेबलने केली आत्महत्या, मरण्यापूर्वी शेअर केला हृदयद्रावक Video

व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, फ्लाइट 914 ने 1955 मध्ये न्यूयॉर्क, अमेरिकेतून उड्डाण घेतले. मात्र उड्डाणाच्या काही क्षणातच हे विमान अवकाशात दूर उडून अचानक गायब झाले म्हणजेच दिसेनासे झाले. त्यांनतर या विमानाचा फार शोध घेण्यात आला मात्र अनेक प्रयत्नानंतरही हा विमान सापडला नाही. त्यावेळी या विमानात एकूण 57 प्रवासी प्रवास करत होते. विमानाचा अपघात झाला असावा या शंकेने अनेकजागी या विमानाला शोधण्यात आले मात्र या विमानाचा एकही भाग सापडला नाही.
त्यानंतर अचानक 985 मध्ये, हे फ्लाइट मियामीच्या हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधते आणि उतरण्यास सांगते. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या लोकांनाही ही माहिती ऐकून आश्चर्य वाटते कारण अशा कोणत्याच विमानाची त्यांना माहिती मिळालेली नसते. जेव्हा फ्लाइट लँड होते, तेव्हा कळते की ही तीच Pan Am Flight 914 आहे जी 30 वर्षांपूर्वी गायब झाली होती.
न्यूज एजन्सी एएफपीच्या रिपोर्टनुसार, फ्लाइट बेपत्ता झाल्याचा दावा साफ खोटा आहे. असे कोणतेही प्रकरण मुळात समोर आले नाही. खरं तर ही माहिती 1985 मध्ये पहिल्यांदा अमेरिकन प्रिंट टॅब्लॉइड, साप्ताहिक वर्ल्ड न्यूजमध्ये प्रकाशित झाली होती. यामध्ये अनेक काल्पनिक कथा प्रकाशित केल्या जायच्या. ही कथा त्यामधील एक काल्पनिक कथा होती, जिला अनेक लोकांनी सत्य म्हणून स्वीकारले आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रकाशित करण्यास सुरुवात केली.






