पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कारवाई… दुबई ते बँकॉक सायबर रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड अखेर जेरबंद… कोट्यवधींच्या ऑनलाइन फसवणुकीमागील मुख्य सूत्रधाराला भारतात आणण्यात पोलिसांना यश आलंय… सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्कुलरच्या मदतीने थायलंडमधील बँकॉक विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर ११ जून रोजी मुंबई विमानतळावर आणून अधिकृत अटक करण्यात आली. देहूरोड पोलीस ठाण्यातील ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या तपासादरम्यान या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश झाला. यापूर्वी या प्रकरणात १३ आरोपींना अटक झाली होती. मात्र, मुख्य सूत्रधार गणेश काळे दुबईतून संपूर्ण नेटवर्क चालवत असल्याचं तपासात उघड झालं. आरोपी भारतातील व्यक्तींकडून बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक आणि इंटरनेट बँकिंगची माहिती मिळवून सायबर फसवणुकीसाठी वापरत होता. हिंजवडीतील १८ लाख आणि सायबर पोलीस ठाण्यातील २ कोटी ६६ लाखांच्या फसवणूक प्रकरणातही त्याचा सहभाग समोर आलाय. या कारवाईमुळे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक मोठ्या सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे….