महाड MIDC परिसरात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा, शासन नियमानुसार किमान वेतन लागू करावे आणि प्रदूषित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी MIDC मधील कंपन्यांच्या पाट्या मराठीत असाव्यात, ठेकेदारांची मनमानी थांबवावी तसेच स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत विविध प्रश्न उपस्थित केले. १५ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही झाली नाही तर “मनसे स्टाईल” आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात मनसे माथाडी कामगार सेनेचे सचिन गोळे, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.