झोपण्याआधी नियमित करा 'या' पिवळ्या रंगाच्या पाण्याचे सेवन, आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. याशिवाय समाजातल्या बऱ्याच कल्पना त्वचेच्या रंगासोबत जोडलेल्या जातात. कोणताच रंग गोरा असतो तर कोणचा रंग सावळा किंवा काळा असतो. वातावरणात होणारे बदल, शरीरातील हार्मोन्सची पातळी, मेलानिन इत्यादी गोष्टींवर त्वचेवर रंग अवलंबून असतो. वेगवेगळ्या महागड्या क्रीम किंवा लोशन लावून वरून त्वचा सुंदर ठेवू शकता, पण आतून त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी पोषण आहार घेणेच आवश्यक आहे. मुरुमे, तेलकट त्वचा किंवा पिंपल्स आल्यानंतर महिला खूप काही करतात.(फोटो सौजन्य – istock)
प्रदूषण, धूळ, माती आणि चिकटपणामुळे त्वचेवर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स केवळ प्रदूषणाच्या सानिध्यात आल्यामुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक वेळीच बाहेर पडून न गेल्यामुळे त्वचेवर मोठे मोठे पिंपल्स येतात आणि त्वचा खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच त्वचेवर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा सुंदर दिसेल.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी बडीशेप खावी. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. नियमित चमचाभर बडीशेप खालेल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. बडीशेप मुरुमे डाग आणि लालसरपणाला कमी करण्यास मदत करतात. त्वचा नैसर्गिकरित्या ताजेतवानी आणि निरोगी ठेवण्यासाठी बडीशेप खावी. जिऱ्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जिर खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचा ब्राइट आणि निरोगी दिसते. ओवा खाल्ल्यामुळे शरीरातील अतिरिक्त तेल कमी आणि विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. मुरूम, पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्या कमी करण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. डिटॉक्स ड्रिंक प्यायल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.






