जसजसा वेळ पुढे जातो तसतशी महागाईदेखील वेगाने वाढत आहे. वाढत्या किमती बघत अनेकांनी आता बाहेरचे खाणे आणि वस्तू खरेदी करणे कितीतरी अंशी कमी केले आहे. वाढत्या अफाट किमती अनेकांना दिवसेंदिवस थक्क करत आहेत आणि अशातच आता सोशल मीडियावर एका जेवणाचे बिल व्हायरल होत आहे. या बिलातील किमती पाहून तुम्ही अचंबित व्हाल.
आजच्या तारखेला जर आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये फक्त चहा आणि नाश्ता खाण्यासाठी बसलो तर आपल्याला 500-600 रुपयांचे बिल सहज येऊ शकते. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर व्हायरल झालेले 1985 चे फूड बिल पाहून लोक हैराण झाले आहेत. हे पाहिल्यानंतर लोकही रंजक प्रतिक्रिया देत आहेत. यातील किमती इतक्या कमी आहेत की या किमतीत आपला एकवेळचा चहादेखील येणार नाही.
हेदेखील वाचा – Viral Photo: सॅलडच्या पिशवीतून बाहेर पडला भयावह जीव, फोटो पाहून अचंबित व्हाल
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये जे दिसते ते आजच्या नवीन पिढीसाठी खरोखरच आश्चर्यकारक आहे. एक बिल हाताने बनवले आहे, त्यावर हस्ताक्षर दिसत आहे. रेस्टॉरंटचे नाव लाझीझ असे आहे आणि हे व्हायरल होत असलेले बिल 20 डिसेंबर 1985 चे आहे. यामध्ये एकूण 4 पदार्थ ऑर्डर केलेले दिसत आहेत, ज्यांचे दर असे आहेत. शाही पनीर – 8 रुपये, दाल मखनी – 5 रुपये, रायता – 5 रुपये आणि रोट्यांची किंमत 6.30 रुपये आहे. अशाप्रकारे, संपूर्ण जेवणाचे बिल 24 रुपये आहे, ज्यावर 2 रुपये सेवा शुल्क आकारल्यानंतर संपूर्ण जेवणाची किंमत 26 रुपये झाली आहे.
हेदेखील वाचा – आई ही आईच असते! बाळाला वाचवण्यासाठी वाघाशी भिडले अस्वल, वाघाशी कशी पाळताभुई एक झाली ते पहाच
या व्हायरल बिलाची पोस्ट @instantbollywood नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला शेअर करताच फार कमी वेळेत ती व्हायरल झाली आहे. अनेकजण यावरील किमती पाहून थक्क होत आहेत. बऱ्याचदा जणांनी या पोस्टवर कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे पार्थ, आता रथ 1985 च्या दिशेने घेऊन जा.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” आता 5 रुपयांची टीप पण कोणी घेत नाही”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, ” आता तर फक्त 26 रुपयांत पाण्याची बॉटल येते”.