Panchat Jokes Once An Elephant Proposed To An Ant Imagine What Did The Ant Answer Read Funny Marathi Jokes To Laugh Out Loud
पांचट Jokes : एकदा एका हत्तीने मुंगीला प्रपोज केले… विचार करा मुंगीने यावर काय उत्तर दिले असेल? वाचाल तर हसून हसून पागल व्हाल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! हत्तीचं मुंगीवर प्रेम जडतं पण मुंगी हत्तीला कुटूंबाचं कारण देत अस काही सुनावते की वाचून तुम्हीही पोट धरून हसाल. मुंगी-हत्तीचे खट्याळ पण मजेदार विनोद एकदा वाचून तर बघा...
झाडावर चढलेल्या काही मुंग्या खालून हत्तीला जाताना पाहतात
एक दुसरीला म्हणते, “मार खाली उडी आणि चिरडून टाक साल्याला!”
दूसरी तिला समजावते, “जाउ दे ग! बिचारा एकटा आहे.”
एकदा हत्ती-मुंगी लपाछपी खेळत असतात
मुंगी मंदिरात जाउन लपते..
तरीही हत्तीला ते कसे समजते?
कारण तिने चपला बाहेर काढलेल्या असतात
हत्ती-मुंगी लग्न करायच ठरवतात
मुंगीला हातात घेउन हत्ती बापाकड़े जातो आणि सांगतो, “मला हिच्याशी लग्न करायचे आहे.”
बाप विरोध करतो. त्यावर चिडून तो हातावर मूठ आपटत म्हणतो, “मी लग्न हिच्याशीच करणार म्हणजे करणार म्हणजे करणार!”
तिथेच मुंगीचा खेळ खल्लास..
एकदा हत्ती धावत धावत जात असतो
मुंगी वाटेत येऊन त्याचा एक पाय पुढे करते. का?
कारण तिला हत्तीला अडखळून पडायचे असते!
वाटेतून जात असताना एकदा हत्ती-मुंगी समोरासमोर येतात
मुंगी हत्तीला म्हणते, “वाटेतून बाजुला हो!”
हत्ती म्हणतो, “मी नाय होणार जा!”
मुंगी चिडून म्हणते, “मुकाटपणे हो नाहीतर तुझ्या कानात येऊन कुर्र्र्र्रररर आवाज आवाज करेन..”
हत्ती घाबरून बाजूला होतो.
एकदा हत्ती नदीवर जातोय असे पाहून मुंगी पटकन बाजुच्या झाडामागे लपते. का?
कारण तिला हत्तीला ‘भो!’ करुन घाबरवायचे असते!
रोमँटिक मूडमध्ये असलेल्या एका हत्तीने मुंगीला छेडलं
मुंगी रागाने हत्तीच्या पत्नीकडे गेली आणि म्हणाली…
“तुझ्या हट्टी नवऱ्याची काळजी घे, नाहीतर आमचे पुरुषही नखरेबाज असतात आणि तूही बाहेर जातेस”
हत्तींच्या रुग्णालयात, एक आजारी हत्ती बेडवर पडला होता….
त्याच्या शेजारी बेडवर काही मुंग्याही बसल्या होत्या….
मग कोणीतरी मुंग्यांना विचारले की तुम्ही सगळे इथे का बसला आहात?
सर्व मुंग्या एकत्र म्हणाल्या : आम्हाला वाटले की कदाचित या हत्तीला रक्ताची गरज पडली तर, म्हणून आम्ही सगळे इथे बसलो आहोत!
एकदा एका हत्तीने मुंगीला प्रपोज केले
मुंगीने त्याला फटकारले आणि म्हणाली : मी तुला किती वेळा सांगितले आहे की माझे कुटुंब ‘इंटर-साईज’ लग्नाला तयार होणार नाहीत.
मला विसरून जा…