Panchat Jokes Nagpanchami Special Read And Share Funny Marathi Jokes Which Will Makes You Laugh
पांचट Jokes : नागानेही मांडली जीवनाची कथा म्हणाला, माणूस वेडा आम्हाला दूध पाजतो अन् घरात बसलेल्या… वाचाल तर हसतंच सुटाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! नागपंचमी स्पेशल नागानेही काही म्हणू पाहिले आहे जे वाचताच तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही. आपल्या नागासारख्या मित्रांना हे मजेदार जोक्स पाठवायला विसरू नका.
गावात नाग पंचमीला लोक दूध देत होते
एक साप म्हणाला : “भाऊ, काही चहापावडरी घालं,
मला दुधाचा कंटाळा आला आहे!”
पांचट Jokes : मुलगा बाबांना विचारतो; बाबा पुरुष म्हणजे नक्की कोण ओ… ? उत्तर वाचाल हसू आवरणं कठीण होऊन बसेल
साप नागिनीला म्हणाला- माझे हृदय तुझ्या प्रेमात आंधळे आहे..
मादी साप म्हणाली, मला विसरून जा बेटा, माझा प्रियकर एनाकोंडा आहे!
कोब्रा : या वर्षी नागपंचमीसाठी तुमचे काय प्लॅन आहेत?
उंदीर साप : अजून दूधवाला आलेला नाही!
पंडित : सापाला दूध दिल्याने पुण्य मिळते.
तरुण : मी सापाला चोकोपाईचे दूध पाजू का?
माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना
नागपंचमीच्या शुभेच्छा!
साप शहरात घुसला,
लोक म्हणाले – “अरे भाऊ, नागपंचमी आहे, मला सेल्फी काढायचा आहे!”
बंड्या- बघ तुझ्या बायकोला साप चावतोय
गण्या- अरे तो चावत नाही त्याचं, विष संपलय म्हणून
तो रिचार्ज करायला आलाय…
लग्नामध्ये रस्त्यावर लोळ,
रस्त्याची साफसफाई करत
नागीण डान्स करणाऱ्या सर्व विषारी, बिनविषारी मित्रांना आठवणीने नागपंचमीच्या शुभेच्छा द्या…
आपल्या मध्येच राहीन
आपल्याला फणा दाखवून
फुस करणाऱ्या नागांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नागाने मांडली जीवनाची कथा म्हणाला…
“माणूस किती वेडा आहे की तो नागपंचमीला मंदिरात जाऊन सापाची पूजा करतो,
पण घरातल्या नागिणीची कोणी पूजा करत नाही,
जी रोजच डसत असते…
आज नागपंचमी आहे, म्हणून सर्व विवाहित पुरुषांनी
सकाळी लवकर आपल्या पत्नींना दूध आणि जिलेबी खाऊ घालावी…
वर्षभर शांती राहील… बाकी नागपंचमी देवतेची इच्छा…