भारताचा स्वातंत्र्यदिन काल मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. देशभरात हा क्षण आनंदाने साजरा केला जात होता. या दरम्यान, भारताचे राष्ट्रगीत ‘जनगणमन’ ज्यांनी रचले असे थोर साहित्यिक आणि नोबेल पुरस्कार विजेते कवी आणि कलाकार रवींद्रनाथ टागोर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नोबेल पुरस्कार पॅनल रवींद्रनाथ टागोर यांनी हाताने लिहिलेल्या जनगणमन या राष्ट्रगीताची लिखित प्रत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आली. नोबेल पॅनलने या इंग्रजी लिपीचा एक्सवर अनुवाद देखील शेअर केला आहे. राष्ट्रगीताची शेअर केलेली ही प्रत आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
हेदेखील वाचा – जमिनीच्या उत्खननात सापडले दोन भयावह सांगाडे अन् 2000 वर्षांचं रहस्य उलगडलं
रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दरचनेला आणि साहित्याला तोड नाही. डिसेंबर 1911 रोजी मूळ बंगाली भाषेत त्यांनी ‘भरोतो भाग्यो बिधाता’ या शब्दात त्यांनी या काव्याचा पहिला छंद लिहिला आहेत. जानेवारी 1950 मध्ये भारतीय संविधानाने राष्ट्रगीत म्हणून या कवितेची निवड केली आहे. ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आहे. खरं तर, रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत मूळ बंगाली भाषेत लिहिले होते. या गीताला 1913 मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त याची सुंदर प्रत सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.
“Jana Gana Mana” is the national anthem of India, originally composed in Bengali by poet Rabindranath Tagore, who was awarded the Nobel Prize in Literature in 1913.
Pictured: An English translation of Jana Gana Mana by Tagore pic.twitter.com/8p1AzBNQoQ
— The Nobel Prize (@NobelPrize) August 15, 2024
टागोरांनी लिहिलेल्या ‘जनगणमन’ गीताची प्रत शेअर करताना नोबल पॅनलने याचा इंग्रजी अनुवाद करून याला शेअर केल्याचे स्पष्ट केले आहे. काळ सकाळी ही प्रत नोबल पॅनलच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली. आतापर्यंत या पोस्टला 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच सुमारे 5000 लोकांनी या पोस्टला लाइक्स दिल्या आहेत. काहींनी यावर कमेंट्स करत आपल्या यावर आपल्या प्रतिक्रियादेखील व्यक्त केल्या आहेत.