भारत आणि चीन हे दोन्ही देश जगातील महत्त्वपूर्ण देश असून यांच्यातील तणाव जगप्रसिद्ध आहे. चीनच्या अनेक थक्क करणाऱ्या बातम्या आपल्या समोर येत असतात मात्र तुम्हाला माहित आहे का? इथे चक्क एका मराठी माणसाची देवाप्रमाणे पूजा केली जाते. चीनमधील अनेक शाळा, महाविद्यालये आणि संग्रहालयांना या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर आजतोवर भारतात आलेल्या चीनच्या प्रत्येक राष्ट्रपतींनींनी या व्यक्तीच्या कुटुंबीयांची आवर्जून भेट घेतली आहे. आता हा व्यक्ती नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, तर चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
चीनमध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते. यांची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारे एक वर्ष आधीपासून सुरू होते. चीन आणि जपानमध्ये 1937 साली एक युद्ध झाले होते. जेव्हा जपानने चीनवर हा हल्ला केला तेव्हा चीनने अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांकडे मदतीचा हाथ मागितली होती. चिनी जनरलने पंडित जवाहरलाल नेहरूंनादेखील पत्र लिहिले होते. त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता, त्यामुळे नेहरूंना विशेष काही करता आले नाही. मात्र एक मदत म्हणून त्यांनी चीनला भारतीय डॉक्टरांची एक टीम पाठवण्याची विनंती ब्रिटिशांकडे केली. यासाठी जाहीर आवाहनदेखील करण्यात आले होते. चीनमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्यांना काँग्रेस पक्षाकडे नावनोंदणी करण्यास सांगण्यात आले.
त्यावेळी डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे आपल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या तयारीत व्यग्र होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, त्यांचा जन्म हा 10 ऑक्टोबर 1910 रोजी झाला. जगभर प्रवास करून वेगवगेळ्या देशातील लोकांवर उपचार करून त्यांची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती. काँग्रेसच्या आवाहनाबाबत माहिती मिळताच त्यांनी चीनला जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने 1938मध्ये एक ऍम्ब्युलन्स आणि पाच डॉक्टरांची टीम चीनला पाठवली. या डॉक्टरांना चीनला पाठवण्यासाठी त्या वेळी काँग्रेसने 22 हजार रुपयांची देणगी गोळा केली होती. जपानविरुद्धच्या युद्धात चीनला मदत करण्यासाठी गेलेल्या आशियाई देशांमध्ये भारत देश सर्वांत पुढे होता.
हेदेखील वाचा – रहस्यमयी किल्ला! 800 वर्षे जुना 9 दरवाजांचा अनोखा किल्ला, इथे राजाने राणीचा शिरच्छेद केला होता…
भारतातून पाठवण्यात आलेली डॉक्टरांची टीम अवघे साडे तीन वर्षे चिनी सैनिकांवर उपचार करत राहिले. यावेळी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी आपले सर्वस्व पणाला लावत जीवाशी झुंज दे असलेल्या अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले. त्यांनी अहोरात्र त्या सैनिकांची सेवा केली. 1940मध्ये त्यांनी सुमारे 72 तास सतत ऑपरेशन केले. असे सांगितले जाते की, डॉ. कोटणीस यांनी त्यावेळी एकट्याने 800हून अधिक चिनी सैनिकांचे प्राण वाचवल्याच्या अनेक नोंदी आहेत.
चीनमध्ये असताना डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे एका चिनी नर्स चिंगलान (Quo Qinglan) च्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केले. त्यानं एक मुलगाही झाला मात्र वयाच्या 24व्या वर्षी त्याचा अकाली मृत्यू झाला. डॉ. कोटणीस आपल्या कामात इतके मग्न असायचे की 18 ते 20 तास ते काम करायचे. यामुळेच यपुढे जाऊन त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम होऊ लागला आणि अवघ्या 32व्या डिसेंबर 1942मध्ये त्यांचे निधन झाले. त्या वेळी त्यांचा मुलगा फक्त तीन महिन्यांचा होता. मृत्यूंनंतर त्यांना हिंदू-चिनी बंधुत्वाचे एक प्रतीक बनले.