फोटो सौजन्य - Social Media
कधी मृतव्यक्ती जिंवत होताना पाहिले आहे का? अशा घटना मुळात घडतच नाहीत. परंतु, अशा अनके गोष्टी आपल्या ऐकण्यात येतात, ज्यात मृत व्यक्ती खरोखरच जिवंत झालेले ऐकण्यास येते. उत्तरप्रदेश राज्यात अशीच एक घटना समोर आली आहे. मुळात, ज्या व्यक्तीसोबत हे घडले आहे, तो मृत नव्हता. त्याला मृत समजून त्याला गाडण्यात आले होते, गाडून सगळे घरी गेल्यानंतर तो युवक जागा झाला आणि कबरीच्या बाहेर आला. जर हि घटना कुणी डोळ्यासमोर पाहिली, तर त्याला हेच वाटेल कि खरंच मृत जमिनीत गाडलेला व्यक्ती जिंवत होऊन कबरीबाहेर आला कि काय?
सदर घटना आग्रा जिल्ह्यातील सिकंदरा येथील अरतौनी क्षेत्रात घडली. विशेष म्हणजे ज्या युवकाला मृत समजून जमिनीत गाडण्यात आले होते. तो मृत नव्हता तर बेशुद्ध होता. हि घटना अत्यंत थरारक होती, कारण त्या युवकास मृत समजून गाडणारे व्यक्तिमत्व त्याचे परिजन नसून हल्लेखोर होते. या हल्ल्यात चार जणांनी त्या युवकास बेदम मारले, त्यामध्ये तो बेशुद्ध झाला.
त्याची निर्जीव अवस्था पाहून हल्लेखोरांना वाटले कि त्या हाणामारीत तो तरुण दगावला. त्यामुळे हल्लेखोरांनी त्या तरुणाला मृतदेह समजून जमिनीत गाडले. तरुण बेशुद्ध अवस्थेत जमिनीत गाडला गेला होता. प्राण्यांनी त्याच्या शरीरास खेचून वर आणले आणि त्याच्या शरीरावरील मांस ओरबाडून खाऊ लागले. यादरम्यान त्या युवकास जाग आली आणि तो तसेच घरी पळून गेला. त्याला परिसरातील लोकांनी दवाखान्यात दाखल केले.
अरतौनी गावातील स्थानिक रामवतीचे म्हणणे आहे कि हि घटना १८ जुलैला घडली. पीडित मुलाचे नाव रूपकिशोर आहे. तर त्या ४ हल्लेखोरांची नावे अंकित, गौरव, करन आणि आकाश आहे.