बरेली घटनेवर काय म्हणाले मुख्यमंत्री योगी? (फोटो- टीम नवराष्ट्र)
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये काल पोलिसांवर दगडफेक
पोलीस अधीक्षक आशुतोष शिवम यांनी अश्रुधुराच्या फोडल्या नळकांड्या
घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती
Bareilly News: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात पुन्हा एकदा निदर्शने झाल्याचे पाहायला मिळत आहे. मौलाना तौकीर रझा यांचे समर्थक शुक्रवारी “आय लव्ह मुहम्मद” या घोषणेच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जमले होते. अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले असताना गर्दीतील एका व्यक्तीने पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीमार केला आणि गर्दी पांगवली. या घटनेवर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘विकसित उत्तर प्रदेश @2047’मध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या विकासावर भाष्य केले. उत्तर प्रदेशमध्ये असणारे माफिया, दंगेखोर यांच्याविरुद्ध झीरो टॉलरेन्स नीतीबाबत सांगितले. 2047 पर्यंत उत्तर प्रदेशला 6 ट्रीलियन डॉलर ईकॉनॉमी अर्थव्यवस्था करण्याबाबत सांगितले.
#WATCH लखनऊ (यूपी): 'विकसित उत्तर प्रदेश विजन @ 2047' कार्यक्रम में मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कहा," पर्व और त्योहारों के दौरान आपने देखा होगा कि जब भी पर्व आते थे तब उत्पाद शुरू हो जाता था। अब उत्पादियों और उपद्रवियों को पता लगेगा और उन्हें उनकी सात पीढ़ियां याद आएंगी क्योंकि… pic.twitter.com/YMXXnUnfmY — ANI_HindiNews (@AHindinews) September 27, 2025
बरेली येथील घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “सत्तेत कोण आहे हे एक मौलाना विसरला होता. त्याने रस्ते बंद करण्याची धमकी दिली होती. मात्र आम्ही कर्फ्यू किंवा नाकेबंदी होणार नाही ही स्पष्ट केले. त्यांच्या भावी पिढ्या देखील दंगा करायचे विसरून जातील असा धडा आम्ही त्यांना शिकवला आहे. ” दंगलखोरांना 2017 नंतर कडक शिक्षा दिली आणि त्यांना समजणाऱ्या भाषेत धडा शिकवलं असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
याबाबत एक औपचारिक पत्र देखील जारी केले. ज्यामध्ये म्हटले आहे की, “दुर्गा पूजा आणि दसरा उत्सवाबरोबरच उर्स-ए-सकलैनी आणि उर्स-ए-शहदाना वली देखील शहरात होत आहेत. आम्ही मुस्लिम समुदायाला शांतता राखण्याचे आणि हे कार्यक्रम रद्द करण्याचा विचार करण्याचे आवाहन करतो. आम्ही फक्त राष्ट्रपतींना उद्देशून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करू.”
आज दुपारी, मौलाना तौकीर रझा यांचे समर्थक पोलिस आणि प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले तेव्हा गर्दीतील एका व्यक्तीने पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि गर्दीला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या, पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. लाठीचार्जमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस आणि प्रशासन अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.