फोटो सौजन्य: व्हिडीओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज नवीन काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून राग येतो. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोणी काय करेल सांगता येत नाही. विशेषत: तरूण मंडळी. अनेकदा ते आपला जीव देखील धोक्यात घालतात. तसेच इतरांचा देखील झीव धोक्यात आणतात. अनेकांना रील बनवण्याचे व्यसन लागले आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एका तरूणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो बाईकने ट्रेन ओढण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक व्हिडीओ बनवत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी संतापलेले आहेत. आणि त्याच्यावर टीका करू लागले. या तरूणाचे हे मूर्खपणा पाहून अनेक लोक त्याला तुरुंगात टाकण्याची मागणी करत आहेत.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरूण बाईकने ट्रेन ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक टन वजन असलेली ट्रेन तो ओढत आहे. तरूणाने ट्रेनच्या इंडिनमध्ये साखळी अडकवून दुचाकीला बांधली आहे. तो त्याच्या सहाय्याने बाईक ओढण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाने ट्रेन खेचण्याचा खूप प्रयत्न केला पण ट्रेन हलली नाही. मुलाने दुचाकीचा वेग जास्त वाढवल्याने दुचाकी एका चाकावर उभी राहिली. हा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील सहारपूर गोवातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याची चांगलीच खरडपट्टी काढल्याची माहिती आहे. अनेक नेटकरी लोक युवकावर संतापलेले आहेत.
हे देखील वाचा – बाईईईईई…काय हा प्रकार? महिलेचा योगा पाहून नेटकरी हसूनहसून लोटपोट; व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओ
What’s the need of such stupidity?
Pankaj from Saharanpur is trying to tow a locomotive with his bike, this isn’t only a threat to railways property but also to his own life, if no action taken, he will continue to do so for like and views & will also inspire others.@RPF_INDIA… pic.twitter.com/edvxNoYUqz— Trains of India (@trainwalebhaiya) September 11, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @trainwalebhaiya नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एवढ्या मूर्खपणाची काय गरज आहे? सहारनपूरचा पंकज त्याच्या बाईकवरून इंजिन ओढण्याचा प्रयत्न करत आहे, हे केवळ रेल्वेच्या मालमत्तेलाच नाही तर स्वत:च्या जीवालाही धोका आहे, जर कारवाई झाली नाही तर लाइक्स आणि व्ह्यूजसाठी आणि इतरांनाही प्रेरणा देण्यासाठी तो असे करत राहील.” यासोबतच युजरने रेल्वे पोलीस आणि यूपी पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.