जमिनीच्या वादातून अख्खं कुटुंब संपवलं, आई-वडील आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या
उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने आई-वडील, आई आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. गाजीपूरमधील नंदगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे.
आरोपी आणि त्याच्या कुटुंबात काही काळापासून जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून आरोपीने आज ही घटना घडवून आणली आहे. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
बिअरचे पैसे मागितल्याने हॉटेलमधील एकाला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण; डोक्यात वीट घातली अन्…
नातेवाईकांच्या हत्येच्या अनेक घटना
उत्तर प्रदेशातील नातेवाईकांची हत्या करण्याचीही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कासगंजमध्येही अशीच घटना घडली होती. येथे ९ मुलांची आई रीनाने तिचा प्रियकर हनीफसह तिचा पती रतिरामची हत्या केली. पोलिसांनी रीना आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायासाठी केलं गेलं प्रवृत्त; ATS ने कारवाई करत केली सुटका
९ मुलांची आई असलेल्या रीनाने तिच्या पतीची हत्या केली कारण ती तिचा मुस्लिम प्रियकर हनीफच्या प्रेमात वेडी होती. कासगंजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेश भारती यांनी सांगितले होते की, दोघेही म्हणतात की ते एकमेकांवर प्रेम करतात. रीनाचा पती रतीरामने याला विरोध केला. त्यानंतर दोघांनी मिळून त्याला संपवण्याचा कट रचला. त्यांनी रतीरामला जंगलात नेले. त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जवळच्या ट्यूबवेलच्या विहिरीत टाकला, अशी माहिती तपासात समोर आली होती.