सिंह हा एक धोकादायक प्राणी असून त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते. अनेकांची सिंहाला पाहताच पळताभुई एक होऊ लागते. मानवच काय तर भलेमोठे प्राण्यांचा सिंहाला थरकाप होऊ लागतो. सिंहाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात त्याच्या दराऱ्याचे, शक्तीचे प्रदर्शन केले जाते मात्र तुम्ही कधी भित्रा सिंह पाहिला आहे का? नाही तर मग आजचा व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच.
सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात कारण तो कळपात राहत नाही किंवा विनाकारण मारामारी करत नाही. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सिंहाची गर्जना एवढी जोरात असते की मोठमोठे प्राणीही थरथर कापतात. मात्र आजच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळेच दिसून येत आहे. गेंड्याला पाहताच सिंहाची कशी हवा टाइट होते ते आजच्या व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – Viral Video: पाकिस्तानी महिला भरपावसात करत होती रिपोर्टिंग, म्हणाली… ऐकूनच पोट धरून हसाल
सध्या सोशल मीडियावर दोन सिंहांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात गेंड्याला पाहताच हे सिंह कसे भित्र्यासारखे पळत आहेत, ते दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन मोठे सिंह जमिनीवर बसलेले दिसतील. अचानक मागून दोन गेंडे येतात आणि दोन्ही सिंह शांतपणे उठून काठावर उभे राहतात. इतकेच नाही तर गेंडा थोडा जवळ येऊन तिथे उभा राहिल्यावर सिंह शांतपणे आपली वाट बदलून दुसरीकडे जाऊ लागतो. त्या दोघांकडे बघून ते गेंड्याला पाहून घाबरल्यासारखे वाटत आहेत. हा व्हिडिओ आता सोशल मेडियावर व्हायरल झाला असून आता युजर्स नक्की जंगलाचा राजा कोण असा प्रश्न निर्माण करत आहेत.
So does this make Rhino the King of the jungle then? pic.twitter.com/e4ok6lNLGS
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 26, 2024
या सर्व घटनेचा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, त्यामुळे मग गेंडा जंगलाचा राजा बनतो का? असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेक युजरने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, सिंह आज लढण्याच्या मूडमध्ये नाही असे दिसते. या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून आता हा व्हिडिओ लोकांच्या चांगल्या पसंतीस पडताना दिसून येत आहे.