फोटो सौजन्य: Gemini
स्वीडिश लक्झरी कार निर्माता कंपनी व्होल्वो कार्सने रीअरव्ह्यू कॅमेरा सिस्टीममधील तांत्रिक समस्येमुळे अमेरिकेतील 4 लाखांहून अधिक कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या रस्ते सुरक्षा एजन्सी, NHTSA (नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन) ने याची पुष्टी केली आहे.
Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV
NHTSA नुसार, या रिकॉलमध्ये एकूण 4,13,151 वाहनांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने व्होल्वो XC40 (मॉडेल वर्ष 2021 ते 2025) चा समावेश आहे.
माहितीनुसार, प्रभावित वाहनांमधील रिअरव्ह्यू कॅमेरा खराब होत आहे, ज्यामुळे ड्रायव्हरला रिव्हर्स करताना मागील दृश्य स्पष्टपणे दिसत नाही. ही समस्या थेट सुरक्षिततेशी संबंधित आहे, कारण रिअरव्ह्यू कॅमेराचे कार्य पार्किंग करताना आणि रिव्हर्स करताना अपघात रोखणे आहे.
व्होल्वोने स्पष्ट केले आहे की ही समस्या सोडवण्यासाठी, डीलरशिपवर मोफत सॉफ्टवेअर अपडेट प्रदान केले जाईल किंवा OTA (ओव्हर-द-एअर) अपडेटद्वारे वाहनात नवीन सॉफ्टवेअर स्थापित केले जाईल. यासाठी ग्राहकांना शुल्क आकारले जाणार नाही.
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
विशेष म्हणजे, याच समस्येमुळे या वाहनांचा हा दुसऱ्यांदा रिकॉल करण्यात आला आहे. Volvo कंपनीने माहिती दिली की मे 2025 मध्येही याच मॉडेलला त्याच बाजारात रिकॉल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नवीन अतिरिक्त सॉफ्टवेअर त्रुटी समोर आली असून, त्यामुळे तीच समस्या पुन्हा उद्भवली आहे. कंपनीनुसार, दुसऱ्या वेळच्या रिकॉलचे कारण आधीपेक्षा वेगळे असले तरी त्याचा परिणाम मात्र तोच आहे.
Volvo च्या म्हणण्यानुसार, सर्व प्रभावित वाहनांसाठी नवीन रेमेडियल सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. हे सॉफ्टवेअर आगामी काही आठवड्यांत OTA (Over-The-Air) अपडेटद्वारे उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे ग्राहकांना वाहन वर्कशॉपमध्ये नेण्याची गरज भासणार नाही.






