सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी अपघाताचे, कधी स्टंट्सचे तर कधी हास्यापद व्हिडिओ शेअर केले जातात. सध्या मात्र सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात वाघांच्या टोळीने जंगलाच्या राजावर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. यात सिंहाची झालेली अवस्था पाहून आता सर्वजण थक्क झाले आहेत. त्यांच्यातील या मारामारीच्या व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. व्हायरल व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
सिंह आणि वाघ यांच्यातील लढाईशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सिंह आणि वाघ यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाच वाघ आणि एक सिंह पिंजऱ्यात बंद केलेले दिसत आहेत. सुरुवातीला सर्व काही शांत आणि सामान्य दिसते, परंतु अचानक वाघांचा एक तुकडा सिंहावर हल्ला करतो. हे दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल, कारण हा हल्ला दुसऱ्या तिसऱ्या कोणावर नसून जंगलाच्या राजावर म्हणजेच सिंहावर केलेला असतो.
ती थेट मांडीवर बसली अन्… धावत्या कारमध्ये कपलचे अश्लील चाळे, Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, सुरुवातीला वाघ आणि सिंह एकमेकांपासून दूर राहतात, पण अचानक वाघांचा एक गट सिंहावर हल्ला करतो. पाच वाघांनी मिळून सिंहाला घेरले आणि मारायला सुरुवात केली. सिंह एकट्याने वाघांचा सामना करू शकत नाही आणि हळूहळू अशक्त होतो. वाघांच्या एकत्रित टोळीची ताकद सिंहाला फार महागात पडते आणि तो त्यांच्यासमोर हार मानतो. हे दृश्य अतिशय धक्कादायक आणि भितीदायक आहे. जंगलाच्या राजाची अशी ही हार पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् झाले आहेत.
सिंह आणि वाघांच्या या लढाईचा व्हिडिओ @viral_ka_tad नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘तुम्ही कधी सिंह आणि वाघाची भांडताना पाहिले आहे का?’ असे लिहिण्यात आले आहे. मुळातच वाघ आणि सिंह हे दोन्ही थरारक आणि धोकायदाक प्राणी आहे, त्यांचा डोळा कोणत्या गोष्टीवर आला तर त्याचे जिवंत वाचणे अशक्य आहे. अशात हे दोन जीवघेणे प्राणी जेव्हा आमने-सामने आले तेव्हा त्यांच्यातील लढाईचा मजेदार थरार पाहून सर्वच थक्क आणि अचंबित झाले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.